VIDEO: 'पारदर्शी कारभार, मोफत पार्किंग आणि स्वच्छ शहर'! उत्पल पर्रीकरांनी सादर केला ‘आमी पणजेकार’चा जाहीरनामा

Utpal Parrikar Manifesto: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेल्या टीकेलाही उत्पल यांनी उत्तर दिले. मनोहर पर्रीकर यांच्यावेळीही काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत काम करीत होते, याची आठवण यावेळी दिली.
Utpal Parrikar Manifesto
Utpal Parrikar ManifestoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : महापालिका निवडणुकीसाठी ‘आमी पणजेकार’ने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यातून पारदर्शी कारभार, पार्किंग सुविधा, स्वच्छ शहरासाठी उपक्रम, व्यावसायिक पर्यटन आणि पायाभूत सुविधा सुधारणा अशा महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून येते.

जाहीरनामा प्रकाशित करण्याचा कोणताही जाहीर कार्यक्रम न करता थेट रस्त्यावरच पत्रकार परिषद घेत ‘आमी पणजेकार’चे नेते उत्पल पर्रीकर म्हणाले की, महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार निवडण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. आम्ही यापूर्वीच पॅनलचा प्राथमिक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

Utpal Parrikar Manifesto
Panaji Municipal Election: उत्‍पल मांडताहेत पणजीच्‍या व्‍यथा! ‘आमी पणजेकार’चा घरोघरी प्रचार; सत्ताबदलाचा निर्धार

त्याचाच संक्षिप्त भाग म्हणून ‘कमिटमेंट्स २०२६’च्या स्वरूपात मतदारांसमोर आणला आहे. आम्ही जो जाहीरनामा दिला आहे, तो मतदारांच्या घरी हा जाहीरनामा दिला जाणार आहे. अगोदर चार पानांचा जाहीरनामा घरोघरी दिला आहे, आता दहा पानांचा जाहीरनामा समोर आणला आहे. त्यात सविस्तर आणि क्यूआर कोडनुसार मतदारांना पाहता येईल.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेल्या टीकेलाही उत्पल यांनी उत्तर दिले. मनोहर पर्रीकर यांच्यावेळीही काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत काम करीत होते, याची आठवण यावेळी दिली. आम्ही कोणताही उमेदवार पक्षाशी संबंधित ठेवलेला नाही, तर वैयक्तिकरित्या उमेदवारी दिली आहेत. आमच्या कोणत्याही उमेदवारावर कोणतीही बंधने नाहीत. पुत्राला महापौर करण्यासाठी पक्षाचे चिन्ह गहाण ठेवणार काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Utpal Parrikar Manifesto
Panaji Election: पणजीच्या समस्या सोडवण्यात महापौर, आमदार अकार्यक्षम! पर्रीकरांचे टीकास्त्र; आवश्‍यक कामे न झाल्याचा दावा

‘कंत्राटदारांचाच भरला गल्ला’

उत्पल पर्रीकर म्हणाले, पणजीत पे-पार्किंग सुरू केले; पण त्यातून पार्किंग सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. मी या विषयावर अनेकदा मत मांडले आहे. कंत्राट दिल्यानंतर सुविधा निर्माण व्हायला हव्या होत्या. उलट संबंधित कंत्राटदाराकडे पैसे जात असून, समस्या वाढतच आहेत.

आम्ही सत्तेवर आल्यावर महापालिकेचा कारभार पारदर्शीपणे केला जाईल. त्याचबरोबर पायाभूत सुविधा, तसेच व्यावसायिक पर्यटनावर भर राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. आम्ही तयार केलेल्या जाहीरनाम्यात पणजीत उपलब्ध केल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती सविस्तर या जाहीरनाम्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com