Goa Weather Update: अवकाळी पावसानं उडवला उन्हाचा 'कडाका'; गारव्यानं नागरिक सुखावले! वादळी वाऱ्यामुळं मात्र अनेक ठिकाणी पडझड

Goa Unseasonal Rain: मडगावात रात्री ८.१५ पासून पाऊणतास मुसळधार पाऊस झाला. पुढे किमान तीन तास कमी अधिक प्रमाणात सुरू होता.
Goa Unseasonal Rain
Goa Unseasonal RainDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'ढग दाटून आलं, नभ उतरू आलं, मातीच्या सुगंधाने मनही दरवळून गेलं', अशी अनुभूती रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने दिली.ऊरात धडकी भरविणाऱ्या ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह राजधानी पणजी, मडगाव, फोंडा, डिचोली, सांगे, धारबांदोडा, सत्तरी, केपेत आज रात्री पाऊस बरसला. वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला.

मडगावात रात्री ८.१५ पासून पाऊणतास मुसळधार पाऊस झाला. पुढे किमान तीन तास कमी अधिक प्रमाणात सुरू होता. या कालावधीत ४३ मिलीमीटर म्हणजेच जवळपास दीड इंच पाऊस झाला. मुसळधार पावसासोबत मातीच्या मृदगंधाने वातावरणात भारावून गेले. डिचोली, सत्तरीत काही ठिकाणी पडझड झाली. सांगेत पुरुमेंताच्या दुकानांत पाणी शिरल्याने लोकांची पुरती तारांबळ उडाली. पुढील तीन दिवस दक्षिण गोव्यातील काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा वर्तविला आहे.

Goa Unseasonal Rain
Sattari Unseasonal Rain: सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा; झाडांची पडझड, घरांचे नुकसान; वीज, पाणी व दूरसंचार सेवा ठप्प

पुढील तीन दिवस तुरळक सरी 'मान्सूनपूर्व' चे प्रमाण घटले तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राज्यात मान्सूनचे आगमन एप्रिलपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. परंतु, यंदा मान्सूनपूर्व काळात • पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत ४२ टक्के इतका कमी आहे. काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने अधूनमधून हजेरी लावली. परंतु, पणजीसह इतर काही भागांमध्ये पाऊस पडला नव्हता.

त्यातच उष्म्यामध्ये ,मोठ्या प्रमाणात वाढ, झाल्याने लोक त्रस्त झाले होते. त्यामुळे सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवारी राज्यातील ५ तपमानाचा पारा ३५ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत गेला होता. अखेर रात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे किमान दिलासा मिळाला. सावईवेरे येथे बाजारात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आंब्याच्या झाडाची फांदी मोडून पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. अग्निशमन कळविण्यात आले मात्र, ते वेळेवर न पोहोचल्यामुळे नागरिकांनीच रस्त्यावर पडलेले फांदी हटविण्याची सुरवात केली होती.

Goa Unseasonal Rain
Goa Pre-Monsoon Rain: वरुणराजा रुसला! पावसाची सरासरी घटली, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; उत्तर गोव्याची बिकट अवस्था

मान्सून अंदमान-निकोबार बेटात,दाखल झाल्याचे केंद्रीय हवामान,विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण मिळाल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात तो गोव्यात दाखल होण्याचा अंदाज राज्य हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात कोठे, काय घडले?

• सांगेत पुरुमेंताच्या फेस्तावेळी अचानक पाऊस आल्याने उडाली तारांबळ.

• नार्वे येथे रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प.

• वेळगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळले. मात्र मोठी हानी टळली.

Goa Unseasonal Rain
Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळी पावसाचा तडाखा; सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी पडझड! सत्तरी, डिचोली आणि पेडण्यात झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान

• मडगावात अचानक अवकाळी पावसामुळे लोकांची त्रेधातिरपीट.

• म्हापसा, पेडण्यासह डिचोलीत ढगांच्या गडगडाटासह पाऊस. पैकुळ सत्तरी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसाळापूर्व कामांना वेग : राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस कधीही सक्रिय होऊ शकतो, हे गृहित धरून सरकारी यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com