Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

Goa Pharmaceutical Export Hub: मोपा आणि दाबोळी या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांचा संयुक्त वापर करून गोव्याला औषधनिर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे हवाई मालवाहतूक केंद्र बनविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Goa Pharmaceutical Export Hub
Goa Pharma Export HubDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मोपा आणि दाबोळी या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांचा संयुक्त वापर करून गोव्याला औषधनिर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे हवाई मालवाहतूक केंद्र बनविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. औषध निर्यात जलद करणे, शीतसाखळी सुविधा विकसित करणे आणि वाहतूक खर्च कमी करणे याद्वारे गोव्याला जागतिक औषध पुरवठा साखळीत महत्त्वाचे स्थान मिळू शकते.

यासंदर्भात आवश्यक उपाययोजनांची माहिती घेऊन येत्या सहा महिन्यांत त्यांची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईटीगव्हर्नमेंटच्या विश्लेषणातून गोव्याच्या या संभाव्यतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारत हा जगातील प्रमुख औषधनिर्मिती देशांपैकी एक असून, गोव्यातही औषधनिर्मिती कंपन्यांचे मोठे जाळे आहे. या कंपन्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी औषधांचे उत्पादन करतात.

Goa Pharmaceutical Export Hub
Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

सध्या औषध निर्यातीसाठी मुंबईसारख्या मोठ्या विमानतळांवर अवलंबून राहावे लागते. रस्ते वाहतुकीतील विलंब, वाहतूक कोंडी आणि माल हाताळणीचा खर्च यामुळे निर्यातीवर परिणाम होतो. गोव्यात सक्षम हवाई मालवाहतूक व्यवस्था उभारल्यास औषध कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवाहतूक सुविधांचा विस्तार करण्याची क्षमता आहे. प्रारंभिक नियोजनानुसार वार्षिक २५ हजार मेट्रिक टन माल हाताळण्याचे उद्दिष्ट होते. भविष्यात ही क्षमता दीड लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याची संकल्पना आहे. दाबोळी विमानतळावरील सुविधांचाही पूरक वापर करता येऊ शकतो.

...निर्यातीसाठी शीतसाखळी

औषध निर्यातीसाठी तापमान नियंत्रित गोदामे, शीतसाखळी, सीमाशुल्क मंजुरी आणि विशेष माल हाताळणी व्यवस्था आवश्यक आहे. लसी, जैविक औषधे आणि तापमानसंवेदनशील उत्पादनांसाठी अखंड शीतसाखळी महत्त्वाची ठरते. वेर्णा आणि तुये येथील औद्योगिक क्षेत्रांना विमानतळांशी जोडणारी कार्यक्षम वाहतूक व्यवस्था विकसित करणेही गरजेचे आहे. नियमित मालवाहतूक सेवा, स्पर्धात्मक दर आणि कंपन्यांचा सहभाग यांवर या योजनेचे यश अवलंबून राहणार आहे.

Goa Pharmaceutical Export Hub
Goa Politics: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-मगो एकत्रच लढणार; युतीचा अंतिम निर्णय दिल्ली दरबारी!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com