UGDP Revival: गोव्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! मिकी पाशेको यांचा 'युगोडेपा'च्या पुनरागमनासाठी पुढाकार

Goa Politics: राज्याच्या राजकारणात एकेकाळी सक्रिय असलेल्या युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टीला (युगोडेपा) पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Goa Politics
UGDP RevivalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी गोव्यात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणात एकेकाळी सक्रिय असलेल्या युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टीला (युगोडेपा) पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सासष्टीत युगोडेपाला ख्रिस्तींचा बराच मोठा जनाधार लाभतो. माजी मंत्री आणि युगोडेपाचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, पक्षाची नवी कार्यकारिणी निवडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या हालचालींमागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Goa Politics
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

युगोडेपाच्या पुनरुज्जीवनाच्या वृत्ताला पाशेको यांनी दुजोरा दिला. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला असून, नव्या कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली आहे. आयोगाकडून लवकरच या अर्जाला मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२७ मधील विधानसभा निवडणूक पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाशेको यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर आनाक्लेत व्हिएगस यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ॲड. राधाराव ग्रासियस यांच्यासह अन्य काही जणांचाही नव्या कार्यकारिणीत समावेश असल्याचे पाशेको यांनी सांगितले.

भाजपचा पाठिंबा असल्याचा काँग्रेसचा आरोप

युगोडेपाच्या पुनरुज्जीवनाच्या हालचालींवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन झाल्यास भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण होऊ शकते. त्यामुळे या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपकडून युगोडेपाला बळ दिले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपमधील काही मंत्री आणि आमदारांचा युगोडेपाच्या नव्या कार्यकारिणीला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचाही दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, नाव न घेता, एका माजी आमदारावर या हालचालींची जबाबदारी घेतल्याचा आरोप केला. या आमदाराचा उल्लेख त्यांनी ‘माऊस’ असा केला. संबंधित आमदार उत्तर गोव्यातील काही माजी आमदारांच्या भेटी घेत असून, कुंभारजुवे येथील एका माजी आमदाराचीही त्यांनी भेट घेतल्याचा दावा पालेकर यांनी केला. निवडणूक लढविल्यास भाजपकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

Goa Politics
Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

मंत्रीही नव्या पक्षाच्या वाटेवर

भाजपचा एक विद्यमान मंत्री युगोडेपामध्ये प्रवेश घेऊ शकतो, अशी माहिती राजकीय सूत्रांनी स्वतःचे नाव न घेण्याच्या अटीवर दिली. त्यांच्या मते, भाजपमध्ये ‘तो’ मंत्री अस्वस्थ आहे व त्याला शेजारील मतदारसंघासह तिसवाडीतील आणखी एक मतदारसंघ हवा आहे. तीन मतदारसंघांवर स्वतःचा प्रभाव असल्याचे ते सांगतात. त्याशिवाय आपल्या हक्काच्या मतदारसंघावर भाजपच्या एका माजी नेत्याच्या पुत्राला जागा करून देण्यासाठी आपल्याला पाणी सोडावे लागेल, अशी त्याला भीती आहे. त्यामुळे तो मंत्री वेगवेगळ्या शक्यता आजमावून पाहू लागला आहे.

आयोगाशी संपर्क : २००२ मध्ये युगोडेपाचे आमदार म्हणून पाशेको यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, पक्षाची नियमित कार्यकारिणी निवडण्यात न आल्याने निवडणूक आयोगाने त्याची नोंदणी रद्द केली होती. आता काही जुन्या सदस्यांना सोबत घेऊन पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

युगोडेपा पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, ही गोष्ट खरी आहे. मात्र, मी अद्याप कोणत्याही विद्यमान किंवा माजी आमदाराला भेटलेलो नाही. पांडुरंग मडकईकर यांची भेट घेतली होती; पण ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती.

- मिकी पाशेको, माजी मंत्री

Goa Politics
Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

युगोडेपा पुनरुज्जीवित करण्यासाठी मिकी पाशेको यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आम्हाला याबाबत कल्पना दिली असून, आम्ही त्याला मंजुरी दिली आहे. या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील.

-ॲड. आनाक्लेत व्हिएगस, सरचिटणीस, युगोडेपा

काँग्रेसचा दावा : भाजपमधील काही मंत्री आणि आमदारांचा ‘युगोडेपा’च्या नव्या कार्यकारिणीला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचाही दावा काँग्रेसने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com