Rajeev Chandrasekhar Goa Visit: केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर गोव्यात दाखल; 3 दिवसांचा दौरा

गोवा क्रांती दिनानिमित्त संबोधित करणार
Rajeev Chandrasekhar Goa Visit
Rajeev Chandrasekhar Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

Rajeev Chandrasekhar Goa Visit: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (MoS) राजीव चंद्रशेखर शुक्रवारपासून तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

या दौऱ्यात ते मडगाव, नावेली आणि फातोर्डा या मतदारसंघांना भेट देणार आहेत. या दौऱ्यावेळी ते भाजपचे नेते, आमदार, कार्यकर्ते, प्रभावशाली लोक, नागरिकांशी संवाद साधतील.

Rajeev Chandrasekhar Goa Visit
Dhargal-Mopa Road Accident: सुके कुळण येथे ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; एक ठार, एक जखमी; संतप्त जमावाने पेटवल्या दोन क्रेन

मंत्र्यांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कामगिरीवर केंद्रित असेल. या तीन दिवसीय दौऱ्यात संपर्क से समर्थन, व्यापारी परिषद आणि युनायटेड फ्रंट कॉन्फरन्स या कार्यक्रमांतून विविध समुदाय आणि गटांसोबत, उद्योजक आणि प्रख्यात बुद्धिजीवी यांच्याशी मंत्र्यांची चर्चा होणार आहे. प्रामुख्याने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यावर चर्चा होईल.

याशिवाय पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी गोव्यातील जनतेने केलेल्या चळवळीचे स्मरण म्हणून ते गोवा क्रांती दिन सोहळ्याला संबोधित करतील. डिजिटल सहभाग, आर्थिक सहभाग याबाबत ते मोदी सरकारच्या कामगिरीवर चर्चा करतील.

Rajeev Chandrasekhar Goa Visit
Goa Illegal Liquor Seized: हैदराबादमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या 521 बाटल्या जप्त; किंमत 12 लाख रूपये, 5 जणांना अटक

व्यापारी परिषदेत सुप्रसिद्ध उद्योजक, स्टार्टअप क्लस्टर्स, एमएसएमई उद्योजक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती उपस्थित राहतील. या वैचारिक देवाणघेवाणीचा उद्देश आर्थिक वाढ आणि वैविध्याला चालना देणे असा आहे.

त्यातून गोव्यात एक गतिमान उद्यम परिसंस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com