PM Modi Launches Vishwakarma Scheme: "पारंपरिक व्यवसायात असलेल्या कारागीर आणि शिल्पकारांना व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना त्यांना प्रोत्साहित करते. तसेच युवा वर्गाला ही योजना त्यांच्या पारंपारिक व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन" केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
रविवारी पणजी येथे आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंदशेठ तानावडे, गोव्याचे कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला."
"पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे उद्घाटन तसेच कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील उद्घाटन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले."
"पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना व्यवसायासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य मिळवणे आणि कौशल्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळवणे सोपे होते,” अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
देशाची सेवा करत असताना पंतप्रधान मोदी अंत्योदयाच्या सिद्धांताचे अनुसरण करत आहेत. पंतप्रधान नेहमीच समाजाच्या उपेक्षित घटकांचा विचार करत असतात. पीएम विश्वकर्मा योजना समाजामध्ये कारागीरांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे असे राज्यसभा खासदार सदानंदशेठ तानावडे यांनी सांगितले.
गोव्याचे कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी देखील या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.