Union Minister Kiren Rijiju: 'जर आज गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असता, तर...'; गोवा दौऱ्यात मोदी सरकारमधील मंत्री बरसले

Union Minister Kiren Rijiju: जर आज काँग्रेस पक्ष गोव्यात सत्तेत असता तर गोवा पूर्णतः संपला असता. गोव्यात सत्तेत असताना काँग्रेसने फक्त खिसे भरायचे काम केले.
Union Minister Kiren Rijiju: 'जर आज गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असता, तर...'; गोवा दौऱ्यात मोदी सरकारमधील मंत्री बरसले
Union Minister Kiren RijijuDainik Gomantak
Published on
Updated on

जर आज काँग्रेस पक्ष गोव्यात सत्तेत असता तर गोवा पूर्णतः संपला असता. गोव्यात सत्तेत असताना काँग्रेसने फक्त खिसे भरायचे काम केले. केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हल्लाबोल केला. रिजिजू सध्या गोवा दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, रिजिजू यांचे गोव्यात जंगी स्वागत करण्यात आले. सावंत सरकारमधील राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रिजिजू गोवा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते गोव्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांशी संवाद साधणार आहेत.

Union Minister Kiren Rijiju: 'जर आज गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असता, तर...'; गोवा दौऱ्यात मोदी सरकारमधील मंत्री बरसले
त्याने माझा हात धरला मी त्याला थांबवले ;पण...सायंतिका बॅनर्जीसोबत बांग्लादेशात काय घडलं

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात देशभरातील अनेक मुद्यांवरुन जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अधिक आक्रमकरित्या सत्ताधारी मोदी सरकारवर हल्लाबोल करतायेत.

Union Minister Kiren Rijiju: 'जर आज गोव्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असता, तर...'; गोवा दौऱ्यात मोदी सरकारमधील मंत्री बरसले
Goa Congress: राहुल गांधींना लक्ष्य केल्याबद्दल काँग्रेसने केला भाजपचा निषेध

काही दिवसांपूर्वी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी पहिल्यांदाच लोकसभेत बोलताना मोदी सरकारच्या गोव्यातील कामांवरुन टीका केली होती. गोव्याला कोल हबमध्ये रुपांतर करु नका, असे म्हणत विरियातो यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. त्यांनी राज्यातील पर्यटनाचा नाश करणाऱ्या प्रकल्पाची सक्ती केल्याबद्दल सरकारवर सडकून टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com