त्याने माझा हात धरला मी त्याला थांबवले ;पण...सायंतिका बॅनर्जीसोबत बांग्लादेशात काय घडलं

अभिनेत्री सायंतिका बॅनर्जीसोबत बांग्लादेशात एक विचित्र घटना घडली आहे.
Sayantika Banerjee
Sayantika BanerjeeDainik Gomantak

Misbehavier with actress sayankita banergee in Bangladesh : बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या नेत्या सांयतिका बॅनर्जीला बांग्लादेशात अतिशय विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे.

सायंतिका बांग्लादेशात

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सायंतिका बॅनर्जीने अलीकडे बांगलादेशमध्ये वाईट वागणुक मिळाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 

मिळालेल्या माहितीसाठी सायंतिका तिचे काम पूर्ण न करता ती अचानक कोलकात्याला परतली. यानंतर सायंतिकाने आपल्यावरचा अनप्रोफेशनल हा शिक्का खोटा असल्याचं सांगितलं आहे. 

सेटवर येणाऱ्या समस्यांबद्दल बोलताना ती म्हणाली की कोरिओग्राफर मायकलनेच तिच्यासोबत गैरवर्तन केले. तिला चित्रपट निर्मात्याकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही तिने सांगितले

एका बांगलादेशी मीडिया आउटलेटने सायंतिकाच्या कोरिओग्राफरसोबतच्या वादाचे वृत्त दिले.

तिने आनंदबाजार ऑनलाईनला दिलेल्या माहिती निर्मात्याच्या गैरव्यवस्थापनामुळे तिला त्रास सहन करावा लागला. 

ती म्हणाली, “सुरुवातीला एक शिक्षक डान्स शूटिंगसाठी आला होता पण आर्थिक अडचणींमुळे तो निघून गेला. मग मायकल नावाचा तरुण मुलगा आला.” "मायकल, माझ्या संमतीशिवाय, माझा हात धरला आणि मी त्याला सर्वांसमोर थांबवले," ती पुढे म्हणाली.

सायंतिका

सायंतिका तिच्या ‘छायबाज’ या चित्रपटासाठी चित्रीकरण करत होती. ताजू कमरूल दिग्दर्शित हा चित्रपट मनिरुल इस्लामची पहिली निर्मिती आहे. यात जयद खानचीही भूमिका आहे.

तिने शूटिंग पूर्ण न केल्याच्या आरोपांचेही खंडन केले. "मी एक व्यावसायिक कलाकार आहे आणि अशा गोष्टी करण्याचा विचारही करू शकत नाही."

"काही तांत्रिक समस्यांबाबत मी निर्मात्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याकडे नियोजन नाही.

सायंतिका म्हणाली

आम्हाला अचानक सांगण्यात आले की एक डान्स सीक्वेन्स शूट होणार आहे. अनेकदा फोन करूनही मनिरुलने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा मी मायकलसोबत असे काम करणार नाही, असे सायंतिका पुढे म्हणाली. 

तिने सांगितले की तिने भारतात परतण्यापूर्वी कॉक्सबाजारमध्ये दोन दिवस वाट पाहिली, पण तिच्या हाती निराशा आली.

Sayantika Banerjee
"ओल्या लाकडांनी मला जाळलंत तर धुराने माझ्या मित्रांच्या डोळ्यांतून पाणी येईल" नाना पाटेकर असं का म्हणाले?

सायंतिकाच्या अटी

सायंतिकाने असाही दावा केला की निर्मात्याने तिला सांगितले की तिला या चित्रपटासाठी त्याच कोरिओग्राफरसोबत काम करावं लागेल.

 शूट, पटकथा आणि इतर गोष्टींबाबत योग्य माहिती दिल्यास ती चित्रपट पुन्हा सुरू करू शकते, असे ती आता सायंतिका म्हणत आहे. 

सायंतिका छायाबाजमध्ये दिसणार की नाही हे माहीत नसले तरी कोलकात्याला रवाना होण्यापूर्वी तिने सहकलाकार जयदसोबत आणखी एक चित्रपट साइन केला आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com