दिवाळीनंतर गोव्याच्या राजकीय स्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार

बैठकीत स्पष्ट : तिकिटे कापली जाण्याच्या अस्वस्थतेवर पक्षात चर्चा
Goa Assembly Election
Goa Assembly ElectionDainik Gomantak

पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या रणनीतीसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत जिंकणाऱ्या उमेदवारांनाच तिकिटे देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, हेही यावेळी स्पष्ट झाले.

Goa Assembly Election
UPच्या डिलिव्हरी बॉयचा गोव्यात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू

‘गोव्याचा मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, अजिबात नाही. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री बदलण्यासंदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या राजकारणाचा भाग आहे,’ अशी प्रतिक्रिया दिल्लीतील पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली.

दिल्लीला तातडीने बोलावले गेल्याने काल संपूर्ण संध्याकाळ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर संक्रांत ओढवल्याची चर्चा सुरू झाली होती. संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराचेही कारण त्यासाठी दिले गेले होते, परंतु काल गोव्याच्या पदाधिकाऱ्यांनी तशी शक्यता फेटाळली होती, तरीही आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मुख्यमंत्र्यांवर मल्लिनाथी करीत गोव्यात त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Goa Assembly Election
महाराष्ट्रातील कारागीरांची कलाकुसर; गोव्यात बांबूच्‍या नरकासुरांना मागणी

महाराष्ट्राचे नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या निकटच्या सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार गोव्यात बदल केला जाणार नाही. उलट भाजपने गोव्यातील मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे.

मुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्ली येथून परतल्यानंतर ते लगेच गुजरातच्या दौऱ्यावर गेले. ते सोमवारपर्यंत (ता. 25) जनतेसाठी उपलब्ध नसतील. सावंत याचा हा गुजरात दौरा खासगी असून ते मंगळवारी गोव्यात परतणार असल्याचे खात्याने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विरोधकांकडून खोटारडेपणा

सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार, अशी अफवा कालपासून गोव्यात पसरल्यामुळे भाजपाला त्याची दखल घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या बातमीचे खंडण केले व मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री, संघटन मंत्री आणि मी दिल्लीला जावून फक्त संघटनात्मक कार्याबद्दल चर्चा केली असून गृहमंत्री अमित शाह यांच्या गोवा दौऱ्याचा तो पाठपुरावा होता, असे तानावडे यांनी सांगितले.

Goa Assembly Election
गोवा मेडीकल हॉस्पिटलचे प्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांचे निधन

त्यांनाच तिकिटे

जे पुढील निवडणुकीत जिंकून येऊ शकतात, अशा नेत्यांची एक यादी पक्षाने तयार केली आहे. त्यांनाच पक्षाची तिकिटे मिळणार आहेत. त्यामुळे तिकिटे कापली जाणार असलेले आमदार अस्वस्थ झाले आहेत. याच अस्वस्थतेचा आढावा दिल्लीत घेण्यात आला.

अमित शहांचा कानमंत्र काय?

सुत्रांनी सांगितले, की दिवाळीनंतर गोव्याच्या राजकीय स्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार असून त्यात चार कुटुंबांतील प्रत्येकी दोन व्यक्तींना तिकिटे दिली जाणार का याचाही सोक्षमोक्ष लागणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या धडाकेबाज मोहिमेमुळे पक्षश्रेष्ठीही भांबावले आहेत, परंतु आम आदमी किंवा तृणमूल यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे गोवा भाजपने हबकून जाऊ नये, तर आपली निवडणूक यंत्रणा अधिक प्रबळ करावी आणि निवडणूक यादी बनविताना कामगिरी हाच निकष पाळावा, असा कानमंत्र अमित शहा यांनी नेत्यांना दिला आहे.

तानावडेंचे ट्विट

मनिष सिसोदिया यांनी गोव्यात नेतृत्वबदल असे जे वक्तव्य केले आहे ते नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरुन लवकरच अरविंद केजरीवाल यांना बदलण्याइतपत हास्यास्पद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com