Goa: सामुदायिक शेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान

सामुदायिक शेती योजने (Farming Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना (farmers) सरकारतर्फे (Goa Government) शेती किंवा त्यासाठी लागणारी साधने, यंत्रांसाठी 90 टक्के अनुदान दिले जाते.
Former MLA Damodar Naik distributing fertilizer to farmers
Former MLA Damodar Naik distributing fertilizer to farmersDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: सामुदायिक शेती योजने (Farming Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना (farmers) सरकारतर्फे (Goa Government) शेती किंवा त्यासाठी लागणारी साधने, यंत्रांसाठी 90 टक्के अनुदान दिले जाते. ही योजना अनुसुचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी आहे. त्यासाठी 10  शेतकऱ्यांचा एक गट करणे आवश्यक असल्याचे फातोर्डाचे (Fatorda) माजी आमदार तथा भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस दामोदर (दामू) नाईक (MLA Damodar Naik) यांनी सांगितले. फातोर्डा येथील आंबाजी, चंद्रवाडो व दवंडे येथील अंदाजे 300 शेतकऱ्यांना खत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तेव्हा नाईक बोलत होते.फातोर्डा येथील अन्य भागातील शेतकऱ्यांना लवकरच खत दिले जाईल असेही त्याने यावेळी घोषित केले. (Under the Community Farming Scheme farmers in Goa get 90 percent subsidy)

Former MLA Damodar Naik distributing fertilizer to farmers
डिसेंबरमध्ये गोवा मलेरिया मुक्त होणार

सरकारच्या ज्या कृषी योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण गेली कित्येक वर्षे करीत आहे. शेती हा शेतकऱ्यांचा जिवनाचा कणा आहे व त्याद्वारे त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कर्तव्य मी बजावत आहे असेही नाईक यांनी सांगितले. जुलै पर्यंत व्हायब्रंट फातोर्डातर्फे शेतकऱ्यांना साधने व यंत्रे पुरविली जाईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Former MLA Damodar Naik distributing fertilizer to farmers
Goa Monsoon Update: चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

काही लोक कोऱ्या कागदावर सह्या घेऊन शेतकऱ्यांना खत वाटपाचे काम करीत आहेत. हे एका दृष्टिने बेकायदेशीर तसेच खोटारडेपणाचे कृत्य आहे. फातोर्डा येथील शेत जमिनी यापुर्वीच रुपांतरीत केल्या आहेत व तेथे इमारती उभ्या केल्या आहेत. फातोर्डाला पुर्वीप्रमाणे हिरवेगार वैभव मिळवुन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com