डिसेंबरमध्ये गोवा मलेरिया मुक्त होणार

गोवा (Goa) राज्य मलेरिया (Malaria) मुक्त राज्य म्हणून जाहीर होणार आहे. मलेरिया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. याची दखल केंद्रीय (Central) स्तरावर घेण्यात आली आहे.
Goa malaria free state
Goa malaria free state Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा (Goa) राज्य मलेरिया (Malaria) मुक्त राज्य म्हणून जाहीर होणार आहे. गोवा राज्याच्या साथीचे रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख व आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात गेल्या तीन वर्षात मलेरियामुळे एकही व्यक्ती दगावलेली नाही. तसेच या काळात मलेरिया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. याची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यानुसार मागील वर्षी डिसेंबरमध्ये गोव्यातर्फे एक अहवाल केंद्राला पाठवण्यात आला होता. त्यानंतर केंद्राने पुढील सहा महिने पाहणी करून गोवा मलेरिया मुक्त जाहीर करण्याचे ठरवले होते. आता सहा महिने उलटले असून येत्या डिसेंबमध्ये गोवा मलेरिया मुक्त राज्य म्हणून घोषित होणार आहे.

Goa malaria free state
गोव्यात 50 लाखाचा तांदूळ जप्त!

गोव्यात गेली तीन वर्षे मलेरियामुळे एकही मृत्यू झालेला नाही. मलेरिया रुग्ण कमी प्रमाणात सापडत असून उपचारानंतर ते लगेच बरे होत आहेत. साथीच्या रोग नियंत्रण विभागाने केलेल्या जागृती व योग्य उपाययोजनांमुळे गोव्यात मलेरिया कमी झाल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

हल्लीच गोवा देशातील पहिले रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते. आता डिसेंबर 2021 ला गोवा मलेरिया मुक्त राज्य घोषित होणार असल्याने आरोग्य क्षेत्रासाठी ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Reservation Latest News
Michael Lobo Bardez Development
Goa Taxi Fare Latest Update
Subhash Velingkar Marathi Language Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com