पणजी: दक्षिण गुजरात (Gujarat) आणि ओडिसा (Odisha) किनारपट्ट्यांवर तयार झालेल्या सर्क्युलेशनमुळे पुढील चार ते पाच दिवस गोवा (Goa) राज्यातील काही भागात जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान (Weather) खात्याने व्यक्त केली आहे. (Goa Monsoon Update heavy rainfall upcoming four days)
राज्यात यंदा सरासरी पावसापेक्षा 4.60 इंच जास्त पाऊस पडला आहे. 26 जूनपर्यंत सरासरी 29.73 इंच पावसाची नोंद होते. ती यंदा आतापर्यंत 34.33 इंच झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे.
शनिवारी पणजीत दुपारी सुमारे दोन तास जोरदार पाऊस पडला. दुसरीकडे जुने गोवे येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पणजीत सुरू झालेल्या जोरदार सरी सुमारे दिड ते दोन तास सुरू होत्या. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला. पणजीत 054.0 मि.मी., जुने गोवे 079.0 मि.मी., म्हापसा 050.0 मि.मी., काणकोण 031.5 मि.मी. तर पेडणेत 030.0 मि. मी. असा पाऊस झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.