Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Ugvem Highway Third Landslide: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उगवे परिसरात डोंगराचा काही भाग अचानक कोसळण्याची घटना घडली.
Ugvem Highway Landslide
Ugvem Highway LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उगवे परिसरात डोंगराचा काही भाग अचानक कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवडाभरात या परिसरात घडलेली ही तिसरी गंभीर घटना असून, यापूर्वी रस्त्यावर मोठे दगड कोसळणे तसेच झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या. आता दरड कोसळल्याने या परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Ugvem Highway Landslide
Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. पावसाचा जोर कायम असल्याने भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Ugvem Highway Landslide
Goa Politics: गोव्यात नव्या प्रादेशिक पक्षाची चर्चा; राजकीय गती की विरोधकांची अधोगती?

उपाययोजनांची मागणी

स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खाते, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी त्वरित पाहणी करून दरडप्रवण भागाची तपासणी करावी, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती उभाराव्यात, सैल दगड हटवावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com