Goa News: कालापुरात खाजन जमीन बुजवण्याचा प्रकार

Goa News: ‘जीसीझेडएमए’कडे तक्रार: टाकाऊ बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
Goa News: कालापुरात खाजन जमीन बुजवण्याचा प्रकार
Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील कालापूर गावात खाजन जमिनीतील सखल भागात बांधकामाचा टाकाऊ कचरा टाकून जमीन बुजवण्यात येत असल्याची तक्रार माजी सांताक्रुझ सरपंच मारियानो आरावजो (माराड) व इतरांनी गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (जीसीझेडएमए) केली आहे.

Goa News: कालापुरात खाजन जमीन बुजवण्याचा प्रकार
Goa Culture: पार्से-तुये श्री भगवती देवी पुनर्भेट उद्या तरंगोत्सव सोहळा

प्राधिकरणाने तक्रारीची दखल घेऊन व तिसवाडी भरारी पथकाने यासंदर्भात त्वरित संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मारियानो यांनी सांगितले की, कालापूर गावातील सर्वे क्रमांक ५३१/१-ए, ५३१/२-ए, ५३१/११-ए, ५३२/१२-ए, ५३२/१३-ए व ५३२/१३-ए हे सहा भूखंड खाजन जमिनीत आहेत. या सखल जमिनीत कोणताही भराव टाकण्यास कायद्यानुसार बंदी आहे. मात्र, या ठिकाणी आतापर्यंत २५ ट्रक बांधकामाचा टाकाऊ कचरा टाकण्यात आला आहे. हे सर्व भूखंड सांताक्रुझ पंचायतीचे असल्याचे प्राप्त माहितीद्वारे स्पष्ट झाले आहेत.

Goa News: कालापुरात खाजन जमीन बुजवण्याचा प्रकार
Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्‍या मुख्य मार्गावर गुजराती भाषेत होर्डिंग्‍ज

किनारपट्टी नियमन क्षेत्र २०११ नुसार खाजन जमिनी संरक्षित आहेत व तिथे कसलेही बांधकाम करता येत नाही. ही खाजन जमीन सखल भागात असल्याने तेथील भागाच्या आराखड्यावर पूर रेषा आखलेली आहे. घातक कचऱ्याचा परिणाम गावावर होऊ नये, यासाठी पंचायतीने सर्व नियमांचे पालन करून या टाकाऊ बांधकाम साहित्याच्या विल्हेवाटीसाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, त्याचे उल्लंघन केले जात आहे,असा दावा तक्रारदार आरावजो यांनी केला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे प्रदूषण रोखावे. जीसीझेडएएमने कचरा टाकणे बंद करावे. भरारी पथकाने या भूखंडांची तपासणी करावी. त्यांच्या तपासणी अहवालानुसार नगर नियोजन खात्याने उल्लंघनकर्त्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी आरावजो यांनी पत्रकारांना माहिती देताना केली.

‘ती’ जागा पंचायत घरासाठीची !

ज्या ठिकाणी बांधकाम टाकाऊ कचऱ्याचा भराव जमिनीत घालण्यात येत आहे, ती जागा पंचायतघरासाठीची आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व परवाने व परवानगी संबंधित खात्याकडून घेण्यात आलेली आहे. या पंचायत घराचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने तेथील सखल जागा या हा कचरा टाकून बुजवण्यात येत आहे. त्यात काहीच गैर किंवा बेकायदा नाही. तक्रारीत काहीच तथ्य नाही. विरोधकांना या प्रकरणाचा बाऊ करायचा असून प्रसिद्धीसाठी त्यांचा हा खटाटोप आहे,अशी प्रतिक्रिया सांताक्रुझ सरपंच जेनिफर ओलिव्हेरा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com