Usgao Leopard Incident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! उसगावात धावत्या बाईकसमोर आला बिबट्या; अपघातात सत्तरीचे दोन तरुण जखमी

Leopard Accident Usgao Goa: उसगाव येथील गावकरवाडा परिसरात धावत्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आल्याने झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले
Leopard Accident Usgao Goa
Usgao Leopard Incident Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: उसगाव येथील गावकरवाडा परिसरात धावत्या दुचाकीसमोर अचानक बिबट्या आल्याने झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले. रविराज गावकर आणि विघ्नेश गावकर (दोघेही रा. शिरसोडे, सत्तरी) अशी जखमींची नावे आहेत.

तिस्क-उसगाव येथील एका आस्थापनातील ड्युटी संपवून दोघेही दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी गावकरवाडा-उसगाव येथे अचानक बिबट्या गाडीसमोर आला.

Leopard Accident Usgao Goa
Bison Attack : दिनेश गावडेवर गव्याकडूनच हल्ला! वन खात्याचा दावा फेटाळला: घटनास्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

गांजे-उसगाव-नाणूस भागातही दर्शन

गांजे-उसगाव-नाणूस परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन खात्याने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com