Goa Beach: कझाकस्तानच्या 2, उत्तर प्रदेशच्या 3 मुलींना बीचवर जीवदान; एकूण 17 जणांना बुडताना वाचवले...

दृष्टी मरिनच्या स्वयंसेवकांची कामगिरी; दिवाळी वीकेंडमधील घटना
Goa Drishti Marine
Goa Drishti MarineDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Beach Drowning: दिवाळी सुट्टीच्या वीकेंडमध्ये गोव्यात वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर दहा घटनांमध्ये तब्बल 17 जणांना समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यात आले. यामध्ये कझाकिस्तानमधील दोघांचा समावेश आहे.

दृष्टी मरीनच्या स्वयंसेवकांनी ही कामगिरी बजावली आहे. बचाव कार्यात सहभागी असलेल्या या एजन्सीनेच ही माहिती दिली.

उत्तर गोव्यातील हरमल समुद्रकिनारी पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकल्यामुळे कझाकस्तानचे दोन परदेशी नागरिक पाण्यात बूडू लागले होते. पण एजन्सीच्या स्वयंसेवकांनी त्यांच्याकडे तत्काळ धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली.

Goa Drishti Marine
Goa Education Model: अभिमानास्पद! गोव्याचे कोडिंग, रोबोटिक्स एज्युकेशन मॉडेल आता उत्तर प्रदेश, राजस्थान ओडिशातही...

याशिवाय हरमलमध्ये दिल्ली आणि बंगळूरू येथील आणखी दोन पर्यटकांनाही बुडण्यापासून वाचवण्यात यश आले.

दृष्टी मरीन लाइफसेव्हर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवार ते रविवार या काळात उत्तर प्रदेशातील तीन मुलींची कळंगुट येथील समुद्रकिनाऱ्यावर सुखरूप वाचवण्यात आले. समुद्रात एन्जॉय करण्याच्या नादात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या होत्या.

अशा इतर घटनांमध्ये आणखी दोन जणांना समुद्रकिनाऱ्यावरून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Goa Drishti Marine
Dabolim Airport: धावपट्टीवर कुत्रा आल्याने आकाशातूनच बंगळुरूला परतले 'ते' विमान; प्रवाशांना नाहक मनस्ताप

प्रवक्त्याने सांगितले की, याशिवाद दृष्टीच्या बचाव पथकांनी मांद्रे, अगोंडा, केळशी, मोरजी आणि सिकेरी या समुद्रकिनाऱ्यावरही बचावकार्य राबवले.

बचाव पथकाने त्यांच्या ऑपरेशन दरम्यान एक पाच वर्षांची आणि एक नऊ वर्षांची अशा दोन बेपत्ता मुलींनाही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Miramar beach business dispute
Goa Ranji team preparation 2026
Gen Z Voters India Elections
Goa Casino Director Shooting Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com