Railway Theft: रेल्वेत दोन चोरीच्या घटना

गुन्हा नोंद: एकूण 8.74 लाखांचा ऐवज लंपास
Calangute Theft Case
Calangute Theft CaseDainik Gomantak

पुणे येथील मैथरी गोपीदास या महिलेची लेडीज बॅग रेल्वेतील चोरट्यांनी चोरून सुमारे 6.86 लाखांचा चुना लावला. ही घटना 11 मे रोजी मडगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वेमध्ये घडली. पर्समध्ये 3.75 लाखांचे सोन्याचे दागिने व सव्वा लाख रोख रुपये होते.

Calangute Theft Case
Goa Sagarmala Project: ‘सागरमाला’ ही केंद्र सरकारची दूरदृष्टी

यानंतर चोरट्याने एटीएमच्या वापर करत आणखी १.७६ लाख रुपये काढले. असा सुमारे ६.८६ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. ही चोरीची घटना मे महिन्यातील आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दुसऱ्या एका घटनेत, मुंबई ते केरळदरम्यान प्रवास करत असताना पेडणे स्थानकादरम्यान केरळ येथील महिलेच्या बॅगची चोरी करीत चोरट्याने बॅगेमधील ६ हजारांची रोकड, आयफोन, घड्याळ असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

Calangute Theft Case
Goa Crime Case: खून, कटकारस्थानाच्या आरोपातून रुलाशा मुक्त

त्यानंतर डेबिट कार्डचा वापर करत ६८,०२८ रुपयांच्या वस्तूंची खरेदी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केरळमधील रिया मेरी यांनी कोकण रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com