Goa Sagarmala Project: ‘सागरमाला’ ही केंद्र सरकारची दूरदृष्टी

श्रीपाद नाईक : 802 प्रकल्प राबविण्यासाठी 5.5 लाख कोटी रुपये खर्च
Goa Sagarmala Project
Goa Sagarmala ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sagarmala Project: दूरदृष्टीचा विचार करून केंद्र सरकारने सागरमाला प्रकल्प राबविण्याचा विचार केला आहे. 802 प्रकल्प राबविण्यासाठी 5.5 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यातून 1.12 लाख कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प पूर्ण झालेले असल्याचे केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

Goa Sagarmala Project
Goa Crime News: गोलतकर खूनप्रकरणी कुंडईकरला सशर्त जामीन

नवी दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक सागरी भारतीय परिषद (जीएमआयएस) २०२३च्या पार्श्‍वभूमीवर मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) आयोजित केलेल्या रोड शोमध्ये ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर एमपीएचे चेअरमन एन. विनोदकुमार, व्हा. चेअरमन गुरुप्रसाद राय, एन.एन. अश्‍वथ, बंदर कप्तान खात्याचे कॅप्टन विकास गावणेकर आदी उपस्थित होते. राज्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या जेटींना होत असलेल्या विरोधावर राज्य मंत्री नाईक म्हणाले, राज्य सरकार विचारविनिमय करून तो प्रश्‍न सोडवेल.

Goa Sagarmala Project
Manipur Violence: गोव्यातील चर्चने केली मणिपूरमध्ये 20 लाख रुपयांची मदत

दरम्यान, भारताचे सागरी क्षेत्र हे तंत्रज्ञानातील प्रगती आणि आधारभूत व्यवसाय वातावरणासाठी पायाभूत सुविधांच्या वाढीद्वारे प्रगतीच्या प्रवासाला सुरवात करत आहे, असे बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुषमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी सांगितले. रोड शोमध्ये विशेष व्हिडिओद्वारे विशेष संदेश दिला.

सर्वात स्वस्त प्रवास

नाईक म्हणाले, नव्या प्रकल्पांमुळे अनेक बदल घडून येत आहेत. जहाज उद्योगातील घटक आणि दृढ सागरी समुदायासह सरकारच्या नेतृत्वाखाली एकजूट, प्रगतीच्या प्रवासाला पुढे नेले जात आहे. देशाला ६५० किलोमीटर किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचा वापर जसा व्हायला हवा होता, तसा झाला नव्हता. परंतु सागरी प्रवास हा रस्ता आणि रेल्वे मार्गापेक्षाही अधिक स्वस्तातील प्रवास आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रवास प्रदूषणमुक्त आहे.

केंद्र सरकारने किनारपट्टीच्या विकासासाठी ८०२ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यातील पावणे दोनशे ते दोनशे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. किनारी भागातील बंदरे रस्ता आणि रेल्वे मार्गाने जोडल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

गोव्याच्या क्रूझ पर्यटन उद्योगाचे यश त्याच्या आर्थिक क्षमतेसह गुंतागुंतीचे आहे. राज्यस्तरावर विचारपूर्वक निर्णयामुळे ते मजबूत झाले आहे. सध्या आम्ही बंदरांच्या उद्देशपूर्ण विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामुळे केवळ डॉकिंग क्षमताच वाढणार नाही, तर प्रवाशांच्या अनुभवांची गुणवत्ता देखील वाढीस लागणार आहे.

- एन. विनोद कुमार, एमपीएचे चेअरमन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com