Goa Crime Case: खून, कटकारस्थानाच्या आरोपातून रुलाशा मुक्त

एकाच तरुणीशी दोघा तरुणांच्या असलेल्या अनैतिक संबंधांतून झालेल्या हरिंदर प्रसाद याच्या खूनप्रकरणातील संशयितांपैकी रुलाशा फर्नांडिस हिला खून व कटकारस्थानाच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुक्त केले.
Goa Crime Case
Goa Crime CaseDainik Gomantak

एकाच तरुणीशी दोघा तरुणांच्या असलेल्या अनैतिक संबंधांतून झालेल्या हरिंदर प्रसाद याच्या खूनप्रकरणातील संशयितांपैकी रुलाशा फर्नांडिस हिला खून व कटकारस्थानाच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुक्त केले. मात्र, पुरावे नष्ट केल्याचा आरोप कायम ठेवला. त्यामुळे तिला खटल्यावरील सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.

Goa Crime Case
Goa Sagarmala Project: ‘सागरमाला’ ही केंद्र सरकारची दूरदृष्टी

संशयित रुलाशा फर्नांडिस हिने या खुनाशी काहीच संबंध नसल्याने तिला त्यातून मुक्त करण्यात यावे यासाठी आरोपपत्र खटल्यावरील सुनावणीवेळी केला होता तो फेटाळण्यात आला होता. तिने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हरिंदर याला झालेल्या माहराणीत व कटकारस्थानात सहभाग नव्हता.

त्यामुळे या खुनाशी काहीच संबंध नसल्याने त्यातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती. खून व कटकारस्थानात सामील असल्याचे पुरावे नसले तरी हरिंदर याचे जमिनीवर व भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून काढण्यात तिचा सहभाग आहे, त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा आरोप याक्षणी रद्द करणे अशक्य आहे, असे कोर्टाने म्हटले.

Goa Crime Case
Goa Crime News: गोलतकर खूनप्रकरणी कुंडईकरला सशर्त जामीन

मारहाणीतून हरिंदरचा मृत्यू

31 ऑक्टोबर 2021 रोजी रात्रीच्या सुमारास हरिंदर प्रसाद कॅबरिना हिच्या घरी गेला असता तेथे सुनील व रुलाशा होती. यावेळी हरिंदर व सुनील यांच्यात कॅबरिना हिच्यावरून वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसान मारहाणीत होऊन हरिंदर प्रसाद याचा मृत्यू झाला होता.

त्याच रात्री त्याचा मृतदेह वाहनातून नेऊन कुंभारजुवे-माशेल येथील पुलाजवळ टाकण्यात आला. सकाळी हा मृतदेह त्या बाजूने जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीस पडला असता त्याची माहिती फोंडा पोलिसांना देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com