गोव्यामध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलमध्ये बनावट नावाने राहणाऱ्या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. तोतयागिरी केल्याप्रकरणी आणि ओळख लपवून पंजीममधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याच्या आरोपाखाली पंजीम पोलिसांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना, हरियाणातील सोनिया दोहन आणि उत्तराखंडमधील श्रेय कोथियाल यांना अटक केली. (two have been arrested for using fake names to stay in hotel where rebel ShivSena MLA was staying in Goa)
गोवा पोलिसांनी शनिवारी एका पुरुष आणि एका महिलेला राज्याच्या डोना पॉला येथील एका तारांकित हॉटेलमध्ये खोट्या ओळखीने राहण्याच्या आरोपाखाली अटक केली. या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचा मुक्काम होता, एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आणि ती महिला एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
पणजीचे पोलिस निरीक्षक सूरज गवस यांनी सांगितले की, पकडलेले दोघेजण बनावट नावाने हॉटेलमध्ये दिवसभर थांबले होते आणि ओळख बदलल्याप्रकरणी त्यांना अटक केली होती. विशेष म्हणजे 29 जून रोजी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देणारे सुमारे 50 आमदार हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी हॉटेलभोवती कडेकोट बंदोबस्त केला होता.
पत्रकारांनाही हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे सर्व आमदार शनिवारी संध्याकाळी मुंबईला रवाना झाले होते. महाराष्ट्रात आठवडाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला आमि त्यांच्या पक्षातील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली. शिंदे आता भाजपच्या मदतीने महाराष्ट्र सरकारची धुरा सांभाळत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.