मुरगाव येथे भाजप-कॉंग्रेस गटात तुफान हाणामारी

प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांशी निष्ठा असलेल्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने मुरगावमध्ये तणावाचे वातावरण; संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती CM सावंत यांनी दिली आहे.
Two groups clash at Mormugao
Two groups clash at MormugaoDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: मुरगाव येथे दोन गटात हाणामारी झाल्याने तणावाचे वातावरण झाले आहे. या हाणामारीत नगरसेवकाचे वडील जखमी झाले. हाणामारी मागचे कारण अद्याप अस्पष्ट असून नगरसेवकांच्या वडीलांना चिखली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Two groups clash at Mormugao)

Two groups clash at Mormugao
प्रमोद सावंत 23 मार्चला घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ?

काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि DGP यांनी चिखली रुग्णालयात भेट घेतली असून, CM सावंत यांनी कडक कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. या हाणामारी प्रकरणात 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन 9 जणांना आधीच अटक करण्यात अलेली आहे.

दंगल, खुनाचा प्रयत्न, अतिक्रमण, मालमत्तेचे नुकसान इत्यादींसह विविध कठोर आयपीसी कलमांतर्गत आतापर्यंत 9 जणांना अटक

काल होळीच्या उत्सवादरम्यान प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांशी निष्ठा असलेल्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर मुरगावमध्ये तणाव निर्माण झाला. मुरगावचे विद्यमान नगरसेवक प्रजय मयेकर यांचे वडील, काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांच्याकडून पराभूत झालेले भाजपचे माजी आमदार मिलिंद नाईक यांचे समर्थक यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. वडिलांवर हल्ला आणि घराचे नुकसान याला काँग्रेस समर्थक जबाबदार असल्याचा आरोप मयेकर यांनी केला. संघर्ष करणाऱ्या गटांनी दगडफेक केल्याने अनेक वाहने आणि काही घरांचे नुकसान झाले आहे. दंगल, खुनाचा प्रयत्न, अतिक्रमण, मालमत्तेचे नुकसान इत्यादींसह विविध कठोर आयपीसी कलमांतर्गत आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा भाग असलेल्या सर्व 47 बदमाशांना ओळखले आहे.

बेकायदेशीर गोष्टींना आजपासून पूर्णविराम

उत्सव साजरा करणार्‍या गटाने विरोधी गटाच्या वाहनांवर आणि घरांवर हल्ला केल्याने आणि दगडफेक केल्याने या घटनेला वेगळे वळण मिळाले. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डीजीपी शुक्ला यांच्यासह नगरसेवक मयेकर यांच्या वडिलांच्या प्रकृतीत असलेल्या चिकली रुग्णालयात भेट दिली. गोव्यात असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. डीजीपी शुक्ला यांनी सांगितले की, त्यांनी सर्व वास्को विभाग पोलीस ठाण्याच्या प्रभारींना त्यांच्या हद्दीत घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांची माहिती वायरलेसद्वारे दररोज सायंकाळी ७ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील जुगार, क्लब आदींसह अशा सर्व बेकायदेशीर गोष्टींना आजपासून पूर्णविराम दिला जाईल, असे प्रतिपादन डीजीपी यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com