Bombay HC: दोन गोमंतकीय मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी

अॅड. वाल्मिकी मिनेझिस आणि अरुण पेडणेकर (Valmiki Menezes and Arun Pednekar) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती
Highcourt Mumbai
Highcourt Mumbai Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे अॅड. वाल्मिकी मिनेझिस आणि अॅड. अरुण पेडणेकर (Valmiki Menezes and Arun Pednekar) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेंदर कश्‍यप यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवनियुक्त अतिरिक्त न्यायाधीशांचा मंगळवारी (दि.19) मुंबई येथे मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शपथविधी होणार आहे.

कायदा मंत्रालयाने शनिवारी (दि.16) जारी केलेल्या अधिसूचनेत मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी दहा जणांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये गोव्यातील या दोन वकिलांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात यासंधर्भात शिफारस करण्यात आली होती.

ॲड. वाल्मिकी मिनेझिस यांनी बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर धेंपे महाविद्यालयातून इंग्लिश विषयात 'बीए'ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी साळगाव कायदा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनोहर उसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1992 पासून विकिली पेशा सुरू केला. गेली 30 वर्षे ते वकिली व्यवसायात असून, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात त्यांनी काम केले आहे.

Highcourt Mumbai
School Dropout Rate: कोरोना काळात गोव्यात शाळा गळतीचे प्रमाण वाढले

मूळचे वास्को येथील अरुण पेडणेकर यांचे शिक्षण गोव्यात झाले. त्यांनी एमईएस महाविद्यालयातून बीए पदवी घेतली व त्यानंतर साळगाव कायदा महाविद्यालयात कायद्याची पदवी घेतली. गोव्याचे माजी ॲडव्होकेट जनरल विजय नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कायदा पेशा सुरू केला. काही वर्षानंतर स्वतःची कायदा प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी दिल्ली येथे गेले. तेव्हापासून ते दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते.

Highcourt Mumbai
Goa Rain : चक्रीय कमी दाबाचा पट्टा सरकला ओमानकडे

नियुक्त झालेल्या इतर अतिरिक्त न्यायाधीशांची नावे

किशोर चंद्रकांत संत, कमल रश्मी खटा, शर्मिला उत्तमराव देशमुख, संदीप विष्णुपंत मारणे, गौरी विनोद गोडसे, राजेश शांताराम पाटील आणि आरिफ सालेह डॉक्टर.

Highcourt Mumbai
Goa News : पर्यटनासाठी डिचोलीचा विकास करणार | Bicholim to be developed for tourism | Gomantak Tv

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com