पणजी: कोरोना महामारीच्या (Covid-19) काळात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केल्याने गोव्यात शाळा गळतीचे प्रमाण वाढले. अशी माहिती गोवा राज्य सरकारने केंद्राला दिली, समग्र शिक्षा अभियानाच्या (SSA) वार्षिक आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. गळती रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी सूचना केंद्राने गोवा सरकारला केली आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी झाले असले तरी, राज्याने गळती रोखण्यासाठी तसेच मुलांना परत शाळेत घेऊन येण्याचे प्रयत्न सुरू ठेवावेत असेही प्रकल्प अधिका-यांनी यावेळी सूचित केले आहे.
"ब्लॉक रिसोर्स केंद्रच्या (Block Resource Centre) वतीने शाळा गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. यामुळे माध्यमिक शाळेतील गळती 10.2 टक्क्यावरून 5.7 टक्क्यांपर्यंत खाली आली. पण, कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांनी स्थलांतर केल्याने प्राथमिक शाळेतील गळती वाढली." असे गोवा सरकारने दाखल केलेल्या अहवालात असे म्हटले आहे.
दरम्यान, वाढत असलेल्या माध्यमिक शाळा गळतीसाठी कठीण अभ्यासक्रम हे एक कारण आहे. त्यासाठी नववीच्या वर्गात जाणा-या विद्यार्थ्यांसाठी दोन ते तीन महिन्याचा पूर्वतयारी मॉड्यूल (Readiness Module) तयार केला जावा. एनसीईआरटी (NCERT) असे मॉड्यूल तयार करत असून राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी त्याचा अवलंब करावा.
तसेच, 100 टक्के उपस्थितीचे लक्ष्य गाठण्यासाठी, जीआयएस मॅपिंगद्वारे (GIS Mapping) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे आवश्यक प्रमाण शोधून काढावे. आणि परिसरातील अनुदानित शासकिय व विनाअनुदानित खासगी शाळांची देखील माहिती गोळा करावी. अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.