IIT Goa : मुख्‍यमंत्र्यांच्या वक्तव्‍यानंतर कोठार्लीत आनंदोत्‍सव; सांगेत मात्र संभ्रम

कोठार्ली-सांगे येथील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण सांगेत अन्‍यत्र जमीन पाहणी सुरू आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
IIT Goa Protest in Sanguem
IIT Goa Protest in SanguemDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्राने मंजुरी नाकारल्यानंतर सांगेतून आयआयटी प्रकल्‍प गुंडाळल्‍यातच जमा आहे. त्‍यातच आता मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयआयटी प्रकल्प गोव्यातच होणार असून, त्‍यासाठी जागेची पाहणी सुरू असल्‍याचे स्‍पष्‍ट केल्‍याने त्‍यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्‍यामुळे कोठार्ली-सांगे येथील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण सांगेत अन्‍यत्र जमीन पाहणी सुरू आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत बोलताना आयसायटी आंदोलक शेतकरी जोसेफ फर्नांडिस यांनी सांगितले की, सांगेचे आमदार आयआयटी सांगेतच होणार असल्याचा अजूनही फुशारक्‍या मारत आहेत. वेळप्रसंगी प्रकल्पासाठी सरकार जमीन खरेदी करणार असल्याचेही सांगत आहेत. लोकांना नको तर त्‍यांना हा प्रकल्‍प सांगेतच का हवा?

झुआरी कंपनीला सरकारने दिलेली कित्‍येक लाख चौरस मीटर जमीन ओसाड पडली असताना गोव्याच्या हितासाठी प्रकल्प उभारताना अन्‍य जमीन का खरेदी करता? स्‍वत:ची जमीन असताना इकडून तिकडे प्रकल्प माथी मारण्याचे कारण तरी काय हे सरकारने स्पष्ट करावे. राज्यात सरकारच्या जमिनी ओसाड असताना सांगेत जमीन खरेदी करून प्रकल्प उभारण्‍याचे कारण काय? गेल्या सात वर्षांत गोव्यात हा प्रकल्प उभारण्‍यासाठी जमीन उपलब्ध होत नाही यावरून सरकारला या प्रकल्पाचे गांभीर्य नसल्याचे स्‍पष्‍ट होते, असा आरोप फर्नांडिस यांनी केला. सरकारकडे मुबलक जमीन असताना हा उपद्व्‍यात कशासाठी, असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

IIT Goa Protest in Sanguem
Primary Health Centre Goa: डिचोलीत आरोग्य केंद्रासमोरच बेशिस्त वाहन पार्किंगचे प्रकार वाढले

युरी आलेमाव यांचा निशाणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आयआयटी प्रकल्पासाठी नवीन जमीन सरकार शोधणार असल्याच्या केलेल्या विधानावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. केरी येथील नायलॉन-66 प्रकल्पाला दिलेली सरकारची जमीन, 3 एसईझेडना दिलेली जमीन तसेच फर्मागुढी येथे उपलब्ध असलेल्या जमिनीत आयआयटी प्रकल्प उभारा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. झुआरी ॲग्रोला दिलेल्या जमिनीचे रिअल इस्टेट लॉबीकडून होणारे शोषण थांबवा. ही जमीन परत घ्या आणि शैक्षणिक संस्थेसाठी वापरा, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com