ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

Konkan Railway: शालिमार एक्सप्रेस झारखंडला जात असल्याचे सांगितल्याने घाईगडबडीत ती पकडण्याच्या नादात त्या युवकाचा तोल गेला व त्याचे दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली सापडले.
Konkan Railway: गणपतीला कोकणात जायचंय, तिकीट नाही मिळालं? काळजी नको, आणखी एक विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
Western RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रोजगाराच्या शोधात गोव्यात आलेल्या एका युवकाला रेल्वेच्या चाकाखाली सापडल्याने आपला जीव गमवावा लागला. मडगावच्या कोकण रेल्वेस्थानकावर गुरुवारी (23 ऑक्टोबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना तो गाडीच्या चाकाखाली आला.

मयत ओडिशा राज्यातील असून, तो ३० वर्षे वयोगटातील आहे, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल नाईक यांनी दिली. तो आपल्या मामेभावासमवेत काल बुधवारी गोव्यात आला होता. एका इसमाने त्याला गोव्यात काम देऊ असे सांगितले होते.

Konkan Railway: गणपतीला कोकणात जायचंय, तिकीट नाही मिळालं? काळजी नको, आणखी एक विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

गोव्यात आल्यानंतर त्या इसमाला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हताश होऊन त्या दोघांनी पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान, आपला मामेभाऊ मरण पावल्याचे समजल्यानंतर त्या दुसऱ्या युवकालाही गंभीर धक्का बसला आहे. तो काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत सध्या नाही.

तसेच मृताचा मोबाईलही बंद पडला आहे. त्या मोबाईलमध्ये मयताचे आधारकार्ड आहे. त्यामुळे मयताचे नाव सध्या तरी मिळू शकले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.

Konkan Railway: गणपतीला कोकणात जायचंय, तिकीट नाही मिळालं? काळजी नको, आणखी एक विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

दोन्ही पाय सापडले रेल्वेच्या चाकाखाली

अमरावती येथे जाणारी शालिमार एक्सप्रेस रेल्वे आली. कुणीतरी ही रेल्वे झारखंड येथे जात असल्याचे सांगितल्याने घाईगडबडीत ती पकडण्याच्या नादात त्या युवकाचा तोल गेला व त्याचे दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली सापडले, त्यानंतर रेल्वे पुढे निघाल्याने तो युवक फरफटत गेला व दूर फेकला गेला. मागाहून त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com