खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Narkasur Issue In Honda Goa: आमच्या मुलांना या प्रकरणात जाणूनबुजून ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे, होंडा येथील ग्रामस्थांनी पोलिस चौकीवर धडक.
Narakasur Case: Honda Villagers Protest, Demand Suspension of Police Officers in Goa
Narakasur case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: होंडा येथील नरकासुर प्रकरण सध्या बरेच गाजत आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे. मात्र, या आठ मुलांचे पालक प्रचंड तणावाखाली असून त्यांनी पोलिसांवर अन्यायाचा आरोप केला आहे. 'आमच्या निर्दोष मुलांना अटक करण्यात आली असून खरे गुन्हेगार मोकाट आहेत' असा त्यांचा आरोप आहे.

होंडा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (२३ ऑक्टोबर) पोलिस चौकीवर धडक दिली. त्यांचे असे म्हणणे आहे की, आमच्या मुलांना या प्रकरणात जाणूनबुजून ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर पोलिस आम्हाला मदत करत नसतील आणि त्यांना या प्रकरणाची काहीच पर्वा नसेल तर असे निष्क्रिय अधिकारी आम्हाला होंडा भागात नकोत. ताबडतोब त्यांची बदली करा.

आमची मुले गरीब घरातील, निर्दोष असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर उद्या त्यांच्यासोबत काही अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

Narakasur Case: Honda Villagers Protest, Demand Suspension of Police Officers in Goa
ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

पालकांनी पुढे नमूद केले की, ज्या रात्री हे प्रकरण पोलिस आऊटपोस्टच्या बाहेर घडले, त्यावेळी वाळपई पोलिस निरीक्षक आणि इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यासमोरच वाहनाची जाळपोळ करण्यात आली. जर पोलिसांनी त्यावेळी योग्य कारवाई केली असती, तर हा प्रकार घडलाच नसता. तसेच तक्रारदार रुपेश पोके यांना ताबडतोब तडीपार करा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

निर्दोष मुलांवर कारवाई

एका पालकाने सांगितले की, माझा मुलगा पर्वरीत कामावर होता आणि दुसऱ्या दिवशी घरी येताना त्याला होंडा येथे अडवून अटक करण्यात आली. तो त्या रात्री घटनास्थळी नव्हता याचा पुरावा आमच्याकडे आहे. तरीसुद्धा पोलिसांनी निर्दोषावर अन्याय केला आहे. आम्ही गरीब आहोत, आमच्या एकुलत्या एक मुलावर अन्याय झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती.

त्याचा फोन बंद होता आणि उशिरा आम्हाला माहिती मिळाली. पोलिसांकडे चौकशी केली असता त्याने आमच्याशी धक्काबुक्की केली असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com