Tiranga DP on Social Media: तिरंग्याचा डीपी ठेवला अन् ट्विटरने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांचे ब्लू टीक हटवले
Tiranga DP on Social Media: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने सोशल मीडियावर तिरंग्याचा डीपी ठेऊन देशभक्ती जपण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केले.
त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला तिरंग्याचा डीपी ठेऊन गोवेकरांना सोशल मिडियावर डीपी बदलण्याचे आवाहन केले होते.
मात्र ज्या भाजप नेत्यांनी तिरंग्याचा डीपी ठेवला आहे, त्यांचे ट्विटर गोल्डन/ ब्लू टिक काढण्यात आले आहे.
यामध्ये काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांचे ब्लू टिक हटवण्यात आले आहे.
भाजपतर्फे देशभरात 'हर घर तिरंगा' योजनेंतर्गत आपल्या सोशल मिडियावर तिरंगा डीपी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व भाजप नेत्यांनी स्वत:च्या सोशल मिडियावर तिरंगा लावला होता.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज्यभरात प्रतिसाद
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री रोहन खंवटे, विश्वजीत राणे, आमदार दिव्या राणे, खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांनी आपले सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी आणि स्टेटसवर तिरंगा झळकवला. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही त्याचे अनुकरण केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.