भररस्त्यात मालवाहू ट्रक अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा

मोर्ले कॉलनी-होंडा मार्गावर वळण घेताना मालवाहू ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प
Truck Stucked on Morlem Honda Road
Truck Stucked on Morlem Honda RoadDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी : साखळीजवळच मोर्ले कॉलनी-होंडा मार्गावर एक मालवाहू ट्रक अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अवघड वळण घेत असताना मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकला. ट्रक अडकल्यामुळे वाहतूक मात्र ठप्प झाली आहे.

Truck Stucked on Morlem Honda Road
पणजी बसस्थानकाजवळ दुचाकीचा अपघात

बेळगावकडून चोर्ला घाटमार्गे वाळपईला जाण्यासाठी मोर्ले कॉलनीतून होंडा येथे येणाऱ्या रस्त्याचा वापर सर्रासपणे केला जातो. मंगळवारी दुपारी एक मोठा मालवाहू ट्रक या मार्गावर वळण घेत असताना भररस्त्यात अडकला. टॅकही अशा विचित्र स्थितीत अडकला की ज्यामुळे त्याला मागे किंवा पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीचा खोळंबा झाला.

Truck Stucked on Morlem Honda Road
पाळोळेसह काणकोणच्या किनारपट्टीला पावसाचा तडाखा

आधीच सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गोव्यात ठिकठिकाणी झाडं कोसळली आहेत. यासोबतच अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यातच मोर्ले-होंडा मार्गावरही या मालवाहू ट्रकमुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com