गेल्‍या सव्वा वर्षात 1547 मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई

परवाने करणार निलंबित
Hyderabad tourists Arrested in Goa For Rash Driving And Two accidents
Hyderabad tourists Arrested in Goa For Rash Driving And Two accidentsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात एप्रिल २०२२ ते जून २०२३ पर्यंत ९५,३९४ नव्या वाहनांची नोंदणी वाहतूक खात्याकडे झाली आहे. इतर राज्यांतून गोव्यात येणाऱ्या वाहनांचा सर्वे केलेला नाही. मद्यपान करून वाहने चालवल्याप्रकरणी या काळात १५४७ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस केल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.

आमदार व्‍हेंझी व्हिएगश यांनी नियमांच्या उल्लंघन प्रकरणी केलेल्या कारवाईसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. राज्यात २०२२ या काळात ३०११ रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यातील २५६ भीषण अपघात आहेत तर २०० गंभीर अपघात आहेत. ४१७ रस्ता अपघात हे किरकोळ आहेत. २१३८ अपघातांमध्ये कोणालाही इजा झालेली नाही.

Hyderabad tourists Arrested in Goa For Rash Driving And Two accidents
Sanguem Car Accident : उगे नदीत कार कोसळून मायलेकाचा दुर्दैवी अंत; सांगेतील घटना

यावर्षी जून २०२३ पर्यंत १४४९ अपघातांची नोंद होऊन १५५ भीषण अपघात घडले आहेत. त्यातील १०८ गंभीर स्वरुपाचे तर २१४ किरकोळ आहेत. ९७२ अपघातात कोणीच जखमी झालेला नाही. भीषण अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहेत. ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते त्यातील अनेकांचा मृत्यू झाला आहे.

  • २०२३ मद्यप्राशनप्रकरणी ५३० जणांवर कारवाई

  • विनाहेल्मेट प्रकरणी १८,२६४ चालकांवर कारवाई

  • १५ महिन्यांत ११४ चालकांना दंड

  • 3 लाख १४,५७४ चालकांविरुद्ध कारवाई

यंदा जूनपर्यंत १६३ मृत्यू

  • यावर्षी २०२३ मध्ये जूनपर्यंत १६३ जणांना अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर १६२ जण गंभीर जखमी झाले. ४३४ जण जखमांवर बचावले.

  • आतापर्यंत वाहतूक खात्याने ३ लाख १४,५७४ चालकांविरुद्ध कारवाई करून १७ कोटी ७९ लाख ६, ६५० रुपये दंड वसूल केला.

Hyderabad tourists Arrested in Goa For Rash Driving And Two accidents
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच खासगी कंपन्यांमध्‍ये होते नोकरभरती : मंत्री बाबूश मोन्‍सेरात

२७४ जणांचा मृत्यू तर २३४ जण गंभीर

  • रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दरवर्षी अडीचशेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रत्येत तीन दिवसामागे दोघा चालकांचा मृत्यू होत आहे असे प्रमाण गोव्यात आहे.

  • २०२२ साली २७४ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे तर २३४ जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील ८२७ जण हे किरकोळ जखमी होऊन सहीसलामत सुटले आहेत.

  • या काळात ४ लाख ९५ हजार ८४७ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून दंडात्मक कारवाईतून १९ कोटी ८४ लाख ९३ हजार ६५१ रुपये महसूल जमा झाला आहे.

  •  ‘वाहतूक खात्याने केलेल्या कारवाई २०२२ मध्ये १०१७ जणांविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करून त्यांचे चालक परवाने निलंबनासाठी शिफारस केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com