Goa Skill Development:
Goa Skill Development:Dainik Gomantak

राज्यातील 29,000 विश्वकर्मा लाभार्थ्यांना 4 जानेवारीपासून देणार प्रशिक्षण; रोजगार मेळावाही होणार...

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित राहणार

Goa Skill Development: केंद्राच्या स्कील डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रुनशिप मंत्रालय तसेच गोवा सरकारच्यावतीने पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह इन गोवा अँड गुरू का सम्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

4 जानेवारी रोजी मडगावच्या रविंद्र भवनात सकाळी 11:15 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर 4 जानेवारी रोजी गोव्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

Goa Skill Development:
Goa Crime: प्लॉटच्या देण्याच्या आमिषाने 3.5 कोटी लुबाडले; आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला पत्नीसह अटक

दरम्यान, चंद्रशेखर यांच्याकडे गोव्यातील दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार ते या मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत.

दरम्यान, केंद्राने अधिसूचित केल्यानुसार राज्यातील एकूण 29000 लोक 18 विविध पारंपरिक व्यवसाय करत आहेत. त्यांना PM विश्वकर्मा योजनेंतर्गत नोंदणीकृत सर्व लोकांना ऑनबोर्ड करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे.

गोव्यातील लाभार्थ्यांसाठी कौशल्य अपग्रेड प्रशिक्षणाची सुरुवात 4 जानेवारीपासून टेलरिंग व्यवसायातील लाभार्थ्यांसह होईल. त्यानंतर सर्व व्यवसायांचे प्रशिक्षण गोव्यात पसरलेल्या 11 केंद्रांद्वारे आयोजित केले जाणार आहे.

Goa Skill Development:
Goa GI Tag: पाव, फिश करी राईसला मिळणार जीआय टॅग? दस्तऐवज तयार करण्यास सुरवात...

पर्यावरण आणि कायदा मंत्री अलेक्सो सिक्वेरा यांनी ही माहिती दिली. 4 जानेवारी रोजी रोजगार मेळावाही आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात गोव्यातील प्रमुख कारागिरांचा सत्कारही होणार आहे.

दरम्यान, ओळखपत्र देणे, नवीन प्रणाली आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, कौशल्ये सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. साधने खरेदी करण्यासाठी रु.50,000 ची मदत दिली जाईल आणि 5 टक्के या नाममात्र व्याजावर रु. 1 लाख कर्ज देखील दिले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com