Goa Rain: मुसळधार पावसामुळे पणजीत वाहतूक कोंडी

Goa Weather: कदंब बसस्थानक जंक्शनजवळची परिस्थिती भयानक
Goa Weather: कदंब बसस्थानक जंक्शनजवळची परिस्थिती भयानक
Goa Panjim RainDainik Gomantak

शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागातील रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. दुचाकीस्वारांना पाणी साचलेल्या भागातून दुचाकी चालवताना अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना त्यांची वाहने पार्क करणेही कठीण होऊन बसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी संध्याकाळी कदंब बसस्थानक जंक्शनजवळची परिस्थिती भयानक झाली.

ज्या ठिकाणी शहराबाहेरून बसेस जातात ते जंक्शन चारचाकी व दुचाकी वाहनांनी खचाखच भरले होते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुचाकी वाहनांना या परिसरातून जाणे कठीण झाले. ऑफिसमधून घरी परतणाऱ्या बहुतेक लोकांना त्याची झळ बसली.

Goa Weather: कदंब बसस्थानक जंक्शनजवळची परिस्थिती भयानक
Panjim Ferry: वादळी वाऱ्यांमुळे चालकाचा अंदाज चुकला अन् फेरीबोट चिखलात रुतली

दुचाकी काळजीपूर्वक चालवण्यासाठी खूप कसरत करावी लागली. शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने प्रवाशांना पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com