Panjim Ferry: वादळी वाऱ्यांमुळे चालकाचा अंदाज चुकला अन् फेरीबोट चिखलात रुतली

Ferryboat Stuck on ramp Panjim Betim Water Route: अंदाज चुकल्यामुळे अनेक तास प्रवाशांचा जीव टांगणीला
Ferryboat Stuck: अंदाज चुकल्यामुळे अनेक तास प्रवाशांचा जीव टांगणीला
Ferryboat stuck at Panjim jettyDainik Gomantak

पणजी-बेती जलमार्गावरील फेरीबोट येथील धक्क्यावर उभी करताना वादळी वाऱ्यांमुळे चालकाचा अंदाज चुकला अन् ती धक्क्याच्या बाजूला असलेल्या चिखलात रुतली. ही घटना आज (मंगळवार) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. त्यामुळे फेरीबोटीत असलेले प्रवासी व वाहनचालकांची धांदल उडाली.

पणजी (Panjim) फेरीबोट धक्क्यावर दुसरी फेरीबोट लावणे शक्य नसल्याने रुतलेली फेरीबोट रात्री उशिरापर्यंत तशीच होती. अडकलेल्या प्रवाशांना हलविण्यात आले, मात्र दुचाकी वाहने फेरीबोटीत तशीच होती. ही फेरीबोट मागे घेणे शक्य नसल्याने भरतीची वाट पाहत रात्री उशिरापर्यंत तेथेच उभी करून ठेवण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच या जलमार्गावरील दुसरी फेरीबोट प्रवाशांच्या मदतीसाठी आणण्यात आली. काही पुरुष प्रवासी उड्या मारून दुसऱ्या फेरीबोटीत गेले, मात्र महिला प्रवाशांची कुचंबणा झाली. वाहनचालकही अडकून पडले.

Ferryboat Stuck: अंदाज चुकल्यामुळे अनेक तास प्रवाशांचा जीव टांगणीला
Sarmanas Jetty: सारमानस फेरीधक्क्यावरुन कार गेली थेट नदीत; कारचालकाचा मृत्यू, तिघेजण बचावले

वादळी वाऱ्यामुळे अंदाज फसला, अन्‌ काळजाचा ठोका चुकला

बेतीहून पणजीकडे येणारी फेरीबोट आज संध्याकाळी वादळी वाऱ्यांमुळे चालकाच्‍या नियंत्रणाबाहेर गेली. ही फेरीबोट नियमित चालक चालवत नव्हता तर फेरीबोटीवर असलेला मशिनिस्ट चालवत होता. पणजीच्या दिशेने येत असताना धक्क्यावर लावण्याऐवजी फेरीबोट डाव्या बाजूने भरकटली व पाण्यातील चिखलात रुतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com