Traffic Jam in Panaji : Ironman 70.3 साठी वाहतुकीत बदल; शहरात 'ट्रॅफिक जॅम'

Ironman 70.3 in Goa : गोव्यात आंतराष्ट्रीय दर्जाच्या Ironman 70.3 या ट्रायथलॉन स्पर्धेची आज सुरुवात झाली आहे.
Traffic Jam in Panaji
Traffic Jam in PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Traffic Jam in Panaji : गोव्यात आंतराष्ट्रीय दर्जाच्या Ironman 70.3 या ट्रायथलॉन स्पर्धेची आज सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील वाहतुकीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी वाहतूक वळवल्यामुळे पणजीत आणि जवळपासच्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. (Ironman 70.3 in Goa)

Traffic Jam in Panaji
Ironman 70.3 Goa: मिरामार येथे आर्यनमॅन स्पर्धेला सुरुवात; विविध देशांतील स्पर्धकांची हजेरी

शहरानजीक असलेल्या मेरशी सर्कलजवळ तीन बाजूंनी वाहतूक सुरू असते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून आले. सर्कलजवळ अनेक वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवक वाहतूक नियंत्रणासाठी सकाळपासून उपस्थित असले तरी बऱ्याच काळ वाहतूक रखडली होती. यामुळे वाहनचालकांना आणि प्रवास करणाऱ्या सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहनांची गर्दी कमी करण्यात, आणि वाहतूक सुरळीत करण्यात मात्र पोलिसांचा कस लागला.

वाहतूक कोंडीने जरी रहदारी रखडली असली आणि स्थानिकांना-कर्मचाऱ्यांना त्रास झाला असला तरीदेखील, या अद्भुत या स्पर्धेसाठीचा उत्साहही यावेळी दिसून आला.

अशाप्रकारे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत:

  • रायबंदर ते दिवजा सर्कल हा मार्ग दुपारी 3.00 पासून ते स्पर्धा संपेपर्यंत बंद असणार आहे.

  • दिवजा सर्कल ते मिरामार सर्कलपर्यंतच्या डी बी मार्गाची वाहतूक ही स्पर्धेच्या दरम्यान बंद असणार आहे.

  • मिरामार सर्कल ते डॉ. जॅक सिक्वेरा मार्ग बंद असणार आहे.

  • एनआयओ सर्कल ते राजभवन मुख्य गेट पर्यंतचा मार्ग बंद असणार आहे.

दरम्यान, आयर्नमॅन शर्यतीत ट्रायथलिट्सना साडेआठ तासांत 1.9 किलोमीटर (खुले) जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग व 21 किलोमीटर धावणे असे तीन टप्पे पार करावे लागणार आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ चळवळीअंतर्गत पोलिस, सेनादल, प्रशासकीय अधिकारी मोठ्या उत्साहाने आयर्नमॅन शर्यतीत शारीरिक तंदुरुस्ती आजमावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com