आज रविवार दि 13 नोव्हेंबर रोजी राजधानीत होणाऱ्या या आव्हानात्मक शर्यतीत अधिकारी वर्गातील 99 ट्रायथलिट्स 33 रिले संघातून भाग घेतले आहेत.
गोव्यातील आयर्नमॅन 70.3 शर्यतीत नियमित स्पर्धकांसह पोलिस, सेनादल, तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचाही कस लागणार आहे
‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ चळवळीअंतर्गत पोलिस, सेनादल, प्रशासकीय अधिकारी मोठ्या उत्साहाने आयर्नमॅन शर्यतीत शारीरिक तंदुरुस्ती आजमावणार आहेत.
गोव्यातील आयर्नमॅन शर्यतीत ट्रायथलिट्सना साडेआठ तासांत 1.9 किलोमीटर समुद्र (खुले) जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग व 21 किलोमीटर धावावे लागणार आहे.
आयर्नमॅन शर्यतीसाठी सरकारी अधिकाऱ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली आहे,
त्यांना सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे शर्यतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक राज यांनी सांगितले.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव 39 वर्षीय आयएएस अधिकारी अजित रॉय आयर्नमॅन शर्यतीत सहभागी होत आहेत.
हैदराबादस्थित पोलिस उप महानिरीक्षक 42 वर्षीय आयपीएस अधिकारी सेजू कुरुविल्ला यांचाही शर्यतीतील सहभाग उल्लेखनीय आहे.
नौदलातील कमांडर राकेश हांडा हे सुद्धा शर्यतीत भाग घेत असून देशातील ही एकमेवाद्वितीय आयर्नमॅन शर्यत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.