Panaji Municipal Corporation : महानगरपालिकेची मार्केटमधील इमारत होणार जमीनदोस्त..!

येत्या सभेत होणार निर्णय : स्थायी समितीने दिली मंजुरी
Panaji Municipal Corporation Budget
Panaji Municipal Corporation Budget Dainik Gomantak

महानगरपालिकेच्या मालकीची आणि कित्येक वर्षांपासून धोकादायक म्हणून घोषित केलेली मार्केट परिसरातील इमारत काही महिन्यांत जमीनदोस्त होणार आहे. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही इमारत पाडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. येत्या सर्वसाधारण सभेत त्याविषयी ठराव मांडला जाणार असून, मंजुरी मिळताच ती इमारत पाडण्याविषयीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मार्केट समिती अध्यक्ष बेंटो लॉरेन यांनी सांगितले, ‘महानगरपालिकेला मार्केटच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू करावयाचे आहे. त्यासाठी ही इमारत हटविणे प्रथम कर्तव्य ठरले आहे. अगोदरच ही इमारत धोकादायक बनली आहे.

Panaji Municipal Corporation Budget
AITUC : कामगारांनो एकत्रितपणे लढा : ख्रिस्तोफर फोन्सेका

मार्केट परिसरात धोकादायक बनलेल्या या इमारतीत काही ठिकाणी कामगार राहतात. ही राहण्याची जागाही बेकायदेशीरपणे भाड्याने देण्यात आलेली आहे, हा सर्व प्रकार वर्तमानपत्रांनी अनेकदा चव्हाट्यावर आणला आहे. तरीही महानगरपालिकेला यावर कडक कारवाई करता आली नाही.

"यापूर्वी महानगरपालिकेच्या अनेक मासिक सभांतून नगरसेवकांनी या इमारतीविषयी प्रश्‍न उपस्थित केले होते. ती इमारत यापूर्वी धोकादायक म्हणून जाहीर झाली आहे. परंतु आता कायदेशीररीत्या ती धोकादायक असल्याचे जाहीर करावे आणि तेथील दुकानदारांचे स्थलांतर करावे. त्याशिवाय येथील दुकानदारांचे स्थलांतर करताना कोणाच्या नावे ती दुकाने आहेत, हेही तपासायला हवे."

उदय मडकईकर, नगरसेवक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com