Goa Shacks: पर्यटकांची सुरक्षा सर्वोच्चस्थानी; शॅक्सना रात्री एकपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

Goa Shack Operators: शिस्त राखत आणि सुरक्षित वातावरणात आता गोव्यातील शॅक्स रात्री १ वाजेपर्यंत चालू राहू शकतील
Shacks in Goa
Shacks in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: काही दिवसांपूर्वी गोव्याच्या किनाऱ्यांवर पर्यटकांसोबत झालेल्या हिंसक घटनेनंतर गोवा पोलिसांनी किनाऱ्यांवरील शॅक्सना रात्री ११ वाजता बंद करण्याची ताकीद दिली होती. मात्र आता पोलीस अधिकारी आणि शॅक मालक यांच्यातील बैठकीनंतर या निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. शिस्त राखत आणि सुरक्षित वातावरणात आता गोव्यातील शॅक्स रात्री १ वाजेपर्यंत चालू राहू शकतील.

आंध्र प्रदेश मधील एका पर्यटकाच्या दुर्दैवी मृत्यू आणि सुरक्षारक्षक आणि शॅक कर्मचाऱ्यांनी पर्यटकांच्या गटावर केलेल्या हल्ल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि यानंतरच शॅक बंद ठेवण्याचा हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला शॅक मालकांनी विरोध दर्शवला होता.

Shacks in Goa
Goa Beach Shacks: ‘रात्री 11 नंतरही शॅक चालू ठेवण्यास परवानगी द्या...'; शॅकमालकांची पुन्हा सरकारकडे मागणी

"शॅक्सना १ वाजेपर्यंत खुलं ठेवण्याची परवानगी दिल्याने याचा प्रश्न सुटला आहे. शिस्त पाळल्यास आपण नक्कीच १ वाजेपर्यंत शॅक्स खुले ठेऊ शकू." नवीन निर्णयावर शॅक ओनर्स वेलफेअर सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी दिलासा व्यक्त केला.

गोव्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकार घडू नये असा आदेश गोवा पोलिसांनी दिलाय. यापूर्वी गोवा पर्यटन विभागाने शॅक ऑपरेटर, जीवरक्षक आणि वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्ससह भागधारकांसह पर्यटकांची सुरक्षा वाढवण्यासाठी उपायांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित व्हावी तसेच गोव्याची प्रतिमा अबाधित राहावी म्हणून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com