Goa Beach Shacks: दारूची विक्री 1 पर्यंत पण 11 वाजता शॅक्स बंद! ऑपरेटर्सचं होतंय आर्थिक नुकसान

Goa Shack Operators: शॅक मालकांच्या मते वेळेवर निर्बंध लावल्याने काहीच बदल होणारे नाहीत.
Goa Beach Shack| Beach Shack Operators | Goa Police | Goa Crime | Goa Tourism
Goa Beach ShackDaunik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यातील शॅकवरून सुरु झालेल्या वादाला अजूनही पूर्णविराम लागलेला नाही. गोवा पोलिसांनी शॅक ऑपरेशनवर ११ नंतर बंदी लावल्यांनंतर आता स्थानिक आणि शॅक मालक यावर वेगवेगळी मतं नोंदवताना दिसतंयत. स्थानिक लोकांच्या मतानुसार शॅक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी शॅक्सवर कारवाई करावी अशी मागणी केली जातेय.तर दुसऱ्या बाजूला शॅक मालकांच्या मते वेळेवर निर्बंध लावल्याने काहीच बदल होणारे नाहीत.

गोव्यातील शॅक ऑपरेटर्सनी ११ वाजता शॅक्स बंद करण्याच्या नियमाच्या अचानक कडक अंमलबजावणीवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते गुन्हेगारी रोखण्याची मूळ करणे शोधण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. शॅक मालक म्हणतायत की रात्री ११ वाजता शॅक्स बंद ठेवल्याने कदाचित गुन्हे कमी होऊ शकतात पण यामुळेच गुन्ह्यणांवर आळा बसेल असा भाग नाही.

आलेल्या पर्यटकांच्या चुकांसाठी आम्हाला का जबाबदार धरलं जातंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. क्रॅकडाऊन असूनही समुद्रकिनाऱ्यांवर अवैध फेरीवाले, दलाल आणि भिकाऱ्यांच्या सतत उपस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला आणि "कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर सातत्यपूर्ण पोलिस का नाही?" असा प्रश्न विचारलाय.

Goa Beach Shack| Beach Shack Operators | Goa Police | Goa Crime | Goa Tourism
Goa Beach Shacks: "शॅक्सना रात्री उशिरा मद्यविक्रीचे परवाने दिल्यानेच अडचणी वाढतायत" स्थानिकांकडून नियम कठोर करण्याची मागणी

शॅकच्या मालकांनी शॅक चालवण्याचे तास आणि मद्य परवाने यांच्यातील परस्परविरोधी नियमांकडे लक्ष वेधले. गोवा पोलिसांनी रात्री ११ वाजेपर्यंत शॅक्स बंद करण्याचे आदेश दिले असताना, मद्यसेवेला पहाटे १ वाजेपर्यंत परवानगी दिलीये, यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे तसेच वेळच्या विसंगतीमुळे गडबड होत असल्याचा दावा ऑपरेटर्सनी केला आहे. त्यांनी शॅक्स सुरु ठेवण्याचे तास वाढवावेत आणि या समस्येवर योग्य तोडगा काढण्याची विनंती केलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com