भूमिका देवस्थान वाद पुन्हा चिघळला! दगडफेक प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी वाळपई पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थांची तोबा गर्दी

Valpoi Police Station Protest: सत्तरी तालुक्यातील पर्ये येथील प्रसिद्ध भूमिका देवस्थान मंदिर परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या दगडफेक प्रकरणावरुन पुन्हा एकदा वाद चिघळला आहे.
 Valpoi Police Station Protest
Bhoomika Temple ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

Bhoomika Temple Controversy: सत्तरी तालुक्यातील पर्ये येथील प्रसिद्ध भूमिका देवस्थान मंदिर परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या दगडफेक प्रकरणावरुन पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. या दगडफेकीप्रकरणी वाळपई पोलीस स्थानकात ज्या स्थानिक ग्रामस्थांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यात आले होते, ते गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (24 जुलै) सायंकाळी 500 पेक्षा अधिक ग्रामस्थांनी वाळपई पोलीस स्थानकाच्या आवारात मोठ्या संख्येने गर्दी केली.

अचानक जमलेल्या या जमावामुळे परिसरात प्रचंड तणावाची स्थिती (Tense Situation) निर्माण झाली आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आणि जमावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 Valpoi Police Station Protest
Goa Postmen Controversy: गोव्यातील 49 पोस्टमन काढले, त्याजागी महाराष्ट्रीयन भरले; अन्यायाविरुद्ध सरदेसाईंचा हल्लाबोल

नेमके प्रकरण काय आहे?

पर्ये येथील भूमिका देवस्थान हे स्थानिक लोकांसाठी श्रद्धास्थान आहे. काही महिन्यांपूर्वी या मंदिराच्या परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली होती, ज्यामुळे मंदिराचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेनंतर वाळपई (Valpoi) पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला होता आणि तपासानंतर काही स्थानिक ग्रामस्थांवर या प्रकरणात गुन्हे नोंदवले होते. मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते निर्दोष असून त्यांना विनाकारण गोवण्यात आले आहे. त्यामुळे, हे गुन्हे मागे घेण्यात यावेत.

परिस्थिती चिघळली

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी 500 पेक्षा जास्त संख्येने ग्रामस्थ वाळपई पोलीस स्थानकाबाहेर जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. या अचानक झालेल्या जमावामुळे पोलीस प्रशासनाची धांदल उडाली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त (Police Bandobast) मागवला आहे. सध्या पोलीस अधिकारी जमावाला शांत करण्याचा आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 Valpoi Police Station Protest
Atala Aadhaar Controversy: इस्रायली 'अटाला'ला आधार कार्ड कसे मिळाले? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा; गोवा खंडपीठात होणार सुनावणी

आमदार देविया राणेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दुसरीकडे, आमदार देविया राणे यांनी सांगितले की भूमिका मंदिरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर काही स्थानिकांवर वाळपई पोलीस स्थानकात गुन्हे नोंद करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी घेऊन गुरुवारी 500 पेक्षा जास्त लोकांनी वाळपई पोलीस स्थानकाच्या आवारात गर्दी केली, ज्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.

दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यासाठी त्यांची सहमती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 Valpoi Police Station Protest
UTAA Controversy: 'वेळीप यांचे दर निवडणुकीत पक्षविरोधी काम', भाजपचे प्रत्त्युत्तर; आदिवासी नेत्यांनी साथ सोडल्याचा दावा

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हे गुन्हे मागे घेतल्याशिवाय ते आंदोलन (Protest) थांबवणार नाहीत. यामुळे, वाळपई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात तणाव असून, पोलीस आणि प्रशासन यावर काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com