'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

Mhadei River Water Dispute: म्हादईचे पाणी कर्नाटकच्या जनतेचा हक्क असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
Goa Karnataka water conflict
DK ShivakumarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या म्हादईबाबत केलेले वक्तव्य कर्नाटक सरकारच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. सावंत यांच्या  वक्तव्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रमोद सावंत यांच्यावर टीका करत म्हादईचा लढा निखराने लढण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांनी तर, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही, असा पवित्रा घेतला आहे.

म्हादई नदीच्या पाणी वाटपावरुन गोवा आणि कर्नाटकात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. कर्नाटक सरकार कळसा – भांडुरा प्रकल्प उभारत असून, यासाठी म्हादईचे पाणी वळवले जाणार आहे. दरम्यान, गोव्याने याला आक्षेप घेतला असून, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पावसाळी अधिवेशात ज्यावेळी म्हादईचा मुद्दा चर्चेस आला, त्यावेळी विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्र सरकारला कर्नाटकला मंजुरी देणार नाही, असे आश्वासन दिले.

Goa Karnataka water conflict
Goa Buffalo Meat Trade: गोव्यात सात महिन्यात 1,505 म्हशींची कत्तल; कित्येक टन मांस विदेशात निर्यात

मुख्यमंत्री सावंत यांच्या या वक्तव्याचे पडसाद कर्नाटकमध्ये उमटले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

“गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी केलेले वक्तव्य धक्कादायक आहे. फेडरल संरचनेत राज्यांमध्ये समान आदर असणे आवश्यक आहे, अशा पद्धतीची वक्तव्य योग्य नाहीत,” असे शिवकुमार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Goa Karnataka water conflict
प्रमोद सावंत यांचे वक्तव्य कर्नाटकच्या जनतेचा अपमान करणारे, केंद्राने मागच्या दाराने केलेले षडयंत्र; म्हादईवरुन सिद्धरामय्यांचा तिळपापड

“२०१८ मध्ये म्हादई जल विवाद न्यायाधिकरणाने कर्नाटकला १३.४२ टीएमसी पाणी दिले असताना, केंद्र सरकार कर्नाटकसोबत राजकारण करत आहे. बेळगाव, धारवाड, गदग आणि बागलकोट येथील ४० लाख लोकांनी पाणी नाकारले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत असताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन मंजुरी देण्याची विनंती केली. म्हादई आमची लढाई आहे, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही,” असे शिवकुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध करत, सावंत यांनी केलेले वक्तव्य कर्नाटकच्या जनतेचा अपमान आहे. तसेच, केंद्र सरकारने मागच्या दाराने केलेले हे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला. म्हादईचे पाणी कर्नाटकच्या जनतेचा हक्क असल्याचे देखील सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com