‘मोपा’ या 13 व्या आंतरराष्ट्रीय ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात मात्र हे विमानतळ 5 जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सने विमान उड्डाणांचे नियोजन आज जाहीर केले आहे.
(IndiGo Airlines announces 12 daily and a total of 168 weekly)
मिळालेल्या माहितीनुसार मोपा विमानतळ 5 जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिगो एअरलाइन्सने विमान उड्डाणांची माहिती देताना म्हटले आहे की, या विमान तळावरुन इंडिगो एअरलाइन्सची दररोज 12 उड्डाणे होतील. तर साप्ताहात एकूण 168 उड्डाणांने होतील. मोपा हे इंडिगोचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नवीन स्टेशन असेल, यामुळे गोवा भारतातील 8 शहरांना जोडणार आहे.
असं आहे विमानतळ
60 मीटर रुंद व साडेतीन किलोमीटर लांबीचा रनवे.
विमान थांबते तिथून पॅसेंजरला ने-आण करण्यासाठी ६० मीटर रुंद आणि साडेतीन किलोमीटर लांब टॅक्स रनवे.
विमाने पार्क करण्यासाठी भव्य पार्किंग तळ.
थेट विमानात पॅसेंजर ये-जा करतील ते पाच पॅसेंजर ब्रीज.
गोमंतकीय संस्कृतीची छाप
मोपा विमानतळावर गोमंतकीय कला आणि संस्कृतीची छाप उमटली आहे. येथील इमारतींची गोमंतकीय संस्कृतीला साजेल अशी रंगरंगोटी केली आहे. प्रवाशांसाठी असलेल्या आराम कक्षात मोठी स्क्रीन बसविली आहे. त्या स्क्रीनवर गोव्यातील सर्व पर्यटनस्थळे पाहता येतील. इमारतीबाहेर सुसज्ज पटांगण तयार केले आहे.
या ठिकाणी पाण्याचे आकर्षक कारंजे आहेत. अशी माहिती समोर आली आहे. तसेच मोपा विमानतळ गोव्यासह लगतच्या सिंधुदुर्ग, बेळगाव या भागांसाठीही वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामधून सरकारला तब्बल 36 टक्के महसूल प्राप्त होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.