9th world Ayurveda Congress 2022: जागतिक आयुर्वेद परिषदेला थाटात सुरुवात; मुख्यमंत्र्यांची गोमंतकीयांसाठी मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 11 रोजी होणार समारोप
world Ayurveda Congress 2022
world Ayurveda Congress 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेला गोव्यात आज सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांसाठी मोठी घोषणा केली. त्यानुसार आयुष संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशात गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के आरक्षण मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्याला जागतिक परिषद आयोजनाची संधी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले.

(9th world ayurveda congress 2022 start with enthusiasm in Panjim)

नवव्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनामध्ये 53 देशांतील 400 परदेशी प्रतिनिधींसह 4500 हून अधिक व्यक्ती सहभागी होणार आहेत. आरोग्य प्रदर्शनात 215 हून अधिक कंपन्या, आघाडीचे आयुर्वेद ब्रँड्स, औषध उत्पादक आणि आयुर्वेदाशी संबंधित शैक्षणिक आणि संशोधन आणि विकास संस्था सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी समारोप जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहाणार आहेत.

या परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की,आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाची जगाला ओळख करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम' ही पहिल्यापासून भारताची भूमिका आहे. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. जगभरातील नागरिकांना आता त्याचा फायदा होत आहे.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, गेल्या आठ वर्षांमध्ये आयुष क्षेत्र प्रचंड वेगाने वाढत आहे. 2022 च्या अखेरपर्यंत आयुष क्षेत्र 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. कोविड महामारीच्या व्यवस्थापनामध्ये आयुषचे फार मोठे योगदान राहिले आहे.

'आयुष' क्षेत्राची बाजारात सहापट वाढ

देशातील आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) क्षेत्राचा बाजारातील वाटा 2014 मधील तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून आता 18 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला असून, यात सहापट इतकी अभूतपूर्व वृद्धी झाली आहे. 2014 ते 2020 या काळात आयुष उद्योगाची वर्षागणिक वृद्धी 17 टक्के इतकी होती, तर 2021 ते 2026 या काळात आयुषचा व्यापार 15 टक्के सीएजीआरने वाढेल, असा अंदाज आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय पर्यटन आणि नौवहन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि, पंजाबचे आरोग्यमंत्री चेतन सिंग, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com