Goa Tourism: 'रोजगार निर्मितीत पर्यटन व्यवसायाचे मोठे योगदान'! मंत्री फळदेसाई यांचे प्रतिपादन

Subhash Phaldesai: गोव्यातील पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.
Subhash Phaldesai
Subhash PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Subhash Phaldesai About Goa Tourism

केपे: गोव्यातील पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करणे ही काळाची गरज आहे. कारण रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात पर्यटन उद्योगाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

ते केपे सरकारी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालय पर्वरी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमानाने शाश्वत पर्यटन या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी मंचावर उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक गॅविन डायस, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नीता मुझुमदार आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्यात शाश्वत पर्यटनपद्घतीना प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर पर्यटन उद्योगासमोरील आव्हानांवर उपाय शोधणे हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू होता.

Subhash Phaldesai
Goa Tourism: गोव्याचे पर्यटन म्हणजे 'सोन्याचे अंडे' देणारी कोंबडी न्हवे! जीव गेल्‍यावरच कठोर कारवाईचा सूर का?

यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नीता मुझुमदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. प्रियांका डिसिल्वा यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. प्रा.त्रिशा वाडील यांनी आभार मानले. कार्यशाळेप्रसंगी आयोजित संशोधनात्मक लेख स्पर्धेत केपे सरकारी महाविद्यालयातील दीक्षिता शिंदे प्रथम क्रमांक, शिवानी दिवाडकर यांनी दुसरा तर नरेंद्र बी.गावकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

Subhash Phaldesai
Goa Tourism: ..अधिकारी 'पॅराग्लायडिंग' पाहत होते मात्र कारवाई झाली नाही, बेकायदेशीर व्यवसायांवरून स्थानिकांचा आरोप

पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यात आणि गोव्याच्या नैसर्गिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारशाचे रक्षण करण्यात गोवा सरकारची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असे उद्गार कार्यशाळेचे सन्मानीय अतिथी आणि उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी काढले. विकसित गोव्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे प्रस्तावित करतानाच गोवा सरकार देत असलेल्या पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर संचालक सावईकर यांनी प्रकाशझोत टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com