Decline in Tourist's Goa: "पर्यटन विभाग फेल!! वेळीच उपाय करा नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील"; लोबो यांचा सरकारला इशारा

Michael lobo Goa: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे
Goa Tourism News
Goa Tourism NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील पर्यटकांची घटती संख्या सध्या चिंतेचा विषय बनत आहे. परदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. गुरुवारी (दि. २७) पत्रकार परिषदेत बोलताना, समुद्रकिनाऱ्यांची खराब देखरेख, वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. तातडीने सुधारणात्मक उपाययोजना न केल्यास, गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोबो यांनी कॅब ॲग्रिगेटर्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये सुरू असलेला संघर्ष, भाड्याने कार देण्याच्या सेवांचा अनियंत्रित विस्तार, समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, पर्यटन क्षेत्रातील अस्वच्छता आणि खांबांवरून लटकलेल्या उघड्या इंटरनेट केबल्स यांसारख्या अनेक समस्यांचा उल्लेख केला.

Goa Tourism News
Goa Tourism: गोव्याच्या आध्यात्मिक पर्यटनाला मिळणार उभारी! ‘एकादश’ उपक्रमाला आता ‘सरिता पूजन’ची जोड; पर्यटनमंत्र्यांची मोठी घोषणा

या समस्यांमुळे गोवा पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडतोय परिणामी गोव्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर गोव्याबद्दल पसरलेल्या नकारात्मक गोष्टींचा मुद्दाही उपस्थित केला आणि गोव्याची बदनामी न करण्याचे आवाहन केले.

पर्यटन मंत्र्यांवर निष्क्रिय ठरत असल्याचा आरोप करत, लोबो यांनी तातडीने सरकारी अधिकारी, पर्यटन भागधारक आणि स्थानिक नेते यांची समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीने पर्यटनाला पुन्हा चालना देण्यासाठी एक योजना तयार करावी, असे त्यांनी सुचवले आहे. "पर्यटकांसाठी सुरक्षितता, स्वच्छतेचे वातावरण तयार करणारी प्रणाली तयार करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे असं लोबो म्हणाले आहेत. इतर देश जर का पर्यावरणाच्या समस्या हाताळू शकत असतील, तर आपण का नाही?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com