Zero Shadow Day in Goa: गोव्यात उद्या तुमची सावली होणार गायब; जाणून घ्या वेळ...

पणजीतील गोवा विज्ञान केंद्रात उद्या झीरो शॅडो डे
Zero Shadow Day in Goa
Zero Shadow Day in GoaDainik Gomantak

Zero Shadow Day on 2nd May in Goa: एरवी, सूर्यप्रकाशात चालताना आपली सावलीही आपली सोबत करत असते. पण, ही सावलीच आता तुमची साथ सोडणार आहे.

होय! गोवेकरांची सावली गायब होणार आहे. अर्थाच यामागे कोणतीही जादू किंवा चमत्कार नाही, तर निसर्गाचा आविष्कार आहे. याच आविष्काराची अनुभूती गोवेकरांना उद्या, 2 मे रोजी घेता येणार आहे.

Zero Shadow Day in Goa
Ponda News: पोलिस आणा नाही तर मिलिटरी आणा, मागे हटणार नाही! सोनारबाग ग्रामस्थांचा निर्धार; उद्या संघर्ष पेटणार

सावली गायब होणे याला झीरो शॅडो डे म्हणून ओळखले जाते. या दिवशी सूर्यकिरणे जमिनीवर एकदम लंबरूप पडतात. त्यामुळे एखाद्या वस्तू, व्यक्तीची सावली पूर्णतः गायब होते. ती इतरत्र दिसत नाही. ती त्याच व्यक्तीच्या खाली जाते. त्यामुळेच झीरो शॅडोची अनुभूती मिळते.

भारतात झीरो शॅडो डे वर्षातून दोन वेळा होत असतो. सहसा हा प्रकार एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये होत असतो. तथापि, गोव्याची राजधानी पणजी येथे उद्या झीरो शॅडो डे अनुभवता येणार आहे.

दुपारच्या वेळी सूर्य नेहमीच डोक्यावर असतो. पण थेट डोक्यावर नसतो. कधी तो उत्तरेला थोडा कललेला असतो तर कधी दक्षिणेला कललेला असतो. अर्थात सूर्य कलत नसतो. तो स्थिरच आहे. पृथ्वीच कलत असते. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने, तसेच पृथ्वीचा अक्ष कलला असल्यामुळे सूर्य कलल्याचा आभास निर्माण होतो.

Zero Shadow Day in Goa
Illegal Liquor Seized: सांगे, धारबांदोडा येथे बेकायदा दारू जप्त, अबकारी विभागाची कारवाई

तर 2 मे रोजी पणजीत सूर्य अगदी डोक्यावर असणार आहे. त्यामुळे जमिनीवर कोणत्याही वस्तूची, व्यक्तीची सावली पडणार नाही.

गोव्यात, 2 मे हा दिवस झीरो शॅडो डे किंवा शून्य सावली दिवस म्हणून साजरा केला जातो. गोवा विज्ञान केंद्र आणि पणजीतील तारांगण येथे हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी उद्या, 2 मे रोजी पणजीमध्ये 12 वाजून 32 मिनिटांनी ही घटना घडणार आहे. या वेळेला जवळजवळ कोणतीही दृश्यमान सावली दिसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com