Tomato Price: ‘टोमॅटो भाजी’साठी सोडले नफ्यावर पाणी !

हॉटेलवाल्यांकडून खवय्यांना दिलासा : दर दीडशेपार असतानाही दरवाढ नाही
Tomato Price
Tomato PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Tomato Price: गोव्याची खाद्यसंस्कृती न्यारीच आहे. येथील हॉटेलमध्ये मिळणारा मेन्यू हा जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. सकाळच्या वेळी पातळभाजी, पाव व मिरची तर सर्वांच्याच आवडीचा नाश्‍ता आहे. या पातळभाजीबरोबरच गोव्यातील पारंपरिक हॉटेल्समधील ‘टोमॅटोंभाजी, सुकी भाजी, सालाड भाजी’ ही तितकीच लोकांची आवडती.

Tomato Price
Panjim Road Issue: पणजीचे 'खड्ड्यांचे' ग्रहण काही सुटेना; सांतिनेजच्या रस्त्याची दुरवस्था

गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून राज्यात व देशातही टोमॅटोंच्या दरात वाढ झाली असली तरी या भाज्यांचे दर आजही हॉटेल्समध्ये जुनेच आहेत. नुकसान सोसूनही आज हॉटेलवाले लोकांच्या पसंतीची भाजी त्याच दरात लोकांना पुरवत आहेत.

गेले दोन महिने टोमॅटोचे दर दीडशे पार झाले होते. सध्या हे दर निम्म्यावर आले आहेत. यापूर्वी गोमंतकीय पारंपरिक हॉटेलवाल्यांनी १४०, १५०, १६० रू. किलो दराने टोमॅटो खरेदी करून लोकांना मागणीनुसार टमाट व सालाड भाजी देण्याची सेवा चालूच ठेवली आहे. टोमॅटोचे दर वाढले म्हणून भाजीच्या दरात एक रूपयाची वाढ केलेली नाही. गेले दोन महिने पूर्वीच्याच दराने नुकसानी सोसून हे हॉटेलवाले लोकांना ‘टमाट व सालाड’ भाजीचा आस्वाद देत आहेत.

Tomato Price
Goa Forest: वणव्यात खाक झालेले जंगल पुन्हा उभं राहणार; वन विभागाचे 365 हेक्टरवर वृक्षारोपण

आज टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वत्र हाःहाकार माजला आहे. या वाढलेल्या दरांचा फटका आम्हाला बसत आहेच. पण लोकांची सेवा व आवड पुरविण्याचे कार्य आम्ही करत आहेत. तसे पाहता भाज्यांचे दरही वाढले आहेत. परंतु याचा परिणाम आमच्या हॉटेलमध्ये होणाऱ्या भाजीच्या दरांवर आम्ही होऊ दिलेला नाही. गोव्यात पातळी भाजीप्रमाणेच ‘टमाट भाजी, सालाड भाजी, सुकी भाजी’ यांनाही बरीच मागणी असते. -विजयलक्ष्मी मापारी, हॉटेलमालक

टोमॅटोचे दर गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेलेच आहेत. म्हणून आमच्या हॉटेलमधील टोमॅटो भाजी आजही पूर्वीप्रमाणेच बनते. या भाजीत टोमॅटोचे प्रमाणही कमी झालेले नाही. चवीनुसार टोमॅटोचे प्रमाण आजही भाजीत कायम आहे. टोमॅटोचे दर वाढले म्हणून भाजीचे दर वाढवले नाहीत. ज्यावेळी टोमॅटोचे दर कमी होते,तेव्हाही भाजीचे दर हेच होते. त्यावेळी आम्ही व्यवसाय केला, कमाई केली. भाजीचे दर उतरवले नव्हते. तर आता दर वाढल्याने भाजीचे दर वाढविण्यात काहीच अर्थ नाही.

- लवू काणेकर, हॉटेलमालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com