Panjim Road Issue: पणजीचे 'खड्ड्यांचे' ग्रहण काही सुटेना; सांतिनेजच्या रस्त्याची दुरवस्था

सांतिनेजमधून ताळगाव आणि मिरामारकडे जाणाऱ्या मार्गाची पावसाळ्यापूर्वीपासून दुरवस्था झाली होती
Road Issue
Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Road Issue: राजधानी पणजीतील सांतिनेज ते मधुबनपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या बाजूला असणारा पथदीप बंद असल्याने रस्त्यावरील खड्डे रात्रीच्यावेळी दिसत नाहीत.

त्याशिवाय गटाराचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील धुळीचा त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. सांतिनेजमधून ताळगाव आणि मिरामारकडे जाणाऱ्या मार्गाची पावसाळ्यापूर्वीपासून दुरवस्था झाली होती. मलनिस्सारणाच्या वाहिन्या टाकण्याच्या कामामुळे हा रस्ता खराब झाला होता.

परंतु जी-20 च्या बैठकांमुळे हे काम गतीने करण्यात आले आणि रस्त्यावर डांबर टाकण्यात आला, परंतु अजूनही मलनिस्सारणाच्या चेंबरसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणची जागा व्यवस्थितरीत्या डांबरीकरण करून सपाट करण्यात आलेली नाही.

पावसामुळे या जागांवर खड्डे पडलेले आहेत. सांतिनेजमधून ताळगावकडे जाताना मधुबन कॉम्प्लेक्सपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूचे पथदीप पेटत नसल्याने रस्त्यावरील खड्डे दुचाकीस्वारांना दिसत नाहीत. काही खड्डे धोकादायक असून काही जणांच्या वाहनांना किरकोळ अपघातही घडलेले आहेत.

तांबडीमाती येथील क्षयरोग रुग्णालय ते मस्जिदपर्यंतचा रस्ता पुन्हा खड्डेमय झालेला आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करून तो चर भरला गेला असला तरी ती जागा खचली आहे.

त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे, वारंवार याबाबत तक्रार करूनही त्याकडे महानगरपालिका लक्ष देत नसल्याच्या येथील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

Road Issue
Meritorious Students Felicitation Ceremony: शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया, विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारायला सज्ज असावे

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होईल. पथदीप पेटत नाहीत म्हणून वीज खात्याला आपण कळविले आहे, तरीही त्यांच्याकडून अद्याप दुरुस्तीचे काम झालेले नाही. खड्डे बुजवण्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवले असून पाऊस पडला नाही, तर दोन दिवसांत ते भरले जातील. - प्रमेय माईणकर, नगरसेवक

Road Issue
त्याच जागी, आजच होणार शिवरायांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना; आमदार कार्लुस फेरेरा लावणार हजेरी, पोलिसांना अल्टिमेटम

खड्ड्यांतील भराव गेला वाहून

महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मदतीने काही ठिकाणच्या रस्त्यांचे खड्डे भरून घेतले असले तरी ते काम पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे.

त्याशिवाय पुढे मधुबन ते भाटलेमधून नेवगीनगरपर्यंत जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झालेली आहे. त्या मार्गावरीलही खड्डे पावसाळ्यातच भरण्यात आले होते, ती जागा पुन्हा वाहनांच्या वाढलेल्या रहदारीमुळे खड्डेमय झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com