Goa Forest: वणव्यात खाक झालेले जंगल पुन्हा उभं राहणार; वन विभागाचे 365 हेक्टरवर वृक्षारोपण

सौरभ कुमार यांची माहिती: प्रामुख्याने स्थानिक प्रजातींच्या अभ्यास,लागवडीवर भर
Goa Forest
Goa Forest Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Forest Department : राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात वणव्याच्या भक्षस्थानी पडलेले जंगल नव्याने उभे करण्यासाठी वन खात्याने सुरुवात केली असून म्हादई अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानासह 365 हेक्टर जंगलात वृक्षारोपण सुरू केल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार यांनी दै.गोमन्तक ला दिली आहे.

Goa Forest
Margao Market: एसजीपीडीए मार्केटात सुधारणा घडविणार; दाजी साळकर

आगीच्या भक्षस्थळी पडलेल्या 480 हेक्टर क्षेत्रापैकी जंगलाचा भाग असणाऱ्या 365 हेक्टरवर वृक्षारोपणाचे लक्ष्य असून त्यानंतरही ही वृक्षारोपण मोहीम सुरूच राहणार आहे. राज्यात मार्चच्या सुरुवातीपासून शेवटच्या आठवड्यापर्यंत बहुतांश अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान, राखीव जंगल, खासगी वनक्षेत्रात अभूतपूर्व वणवे लागले होते.

देशी झाडांची लागवड, वनस्पतींची तपशीलवार नोंद

राज्यात अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान आणि खाजगी वनक्षेत्रांमध्ये विपुल वनसंपदा आहे. हरित क्षेत्राचे ( ग्रीन कव्हर) प्रमाणही राष्ट्रीय प्रमाणापेक्षा राज्यात जास्त आहे. हा पश्चिम घाटाचा मध्य कॉरिडोर असल्याने विविध प्रकारची झाडे, झुडपे, वृक्ष, वेलींचा यात समावेश आहे.

यात देशी ( प्रदेशनिष्ठ) झाडे, झुडपे, गवतांचा यात समावेश आहे. वन विभागाने या वनस्पतींची तपशीलवार नोंद केली असून अशाच देशी वनस्पतींची नव्याने लागवड करण्यात आली आहे, अशी माहितीही सौरभ कुमार यांनी दिली.

वनसंपत्तीचे मोठे नुकसान: या आगीच्या भक्षस्थानी प्राण्यांबरोबर ‘फ्लोरा फोना’ अर्थात नानाविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींचे,प्रजातींचे मोठे नुकसान झाले होते. मोठ्या वृक्षांबरोबर झुडपे, वेली, खुरट्या वनस्पती, गवतांचे विविध प्रकार नष्ट झाले आहेत. ही वनसंपदा पुन्हा उभी करण्यासाठी वन वनखात्याने सुरुवात केली आहे.

Goa Forest
Panjim Road Issue: पणजीचे 'खड्ड्यांचे' ग्रहण काही सुटेना; सांतिनेजच्या रस्त्याची दुरवस्था

प्रामुख्याने स्थानिक प्रजातींचा अभ्यास आणि लागवड केली जात आहे.यासाठी धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण येथील नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यात आली होती.

‘सीड बॉल’चा वापर

मार्च महिन्यात जंगलांना लागलेल्या आगीमध्ये डोंगर, दऱ्या, दुर्मिळ उभे कडे आणि दुर्गम भूभागांचा समावेश होता. येथे लागलेले वनवे विझवणे वन विभाग, अग्निशमन दलाला शक्य नव्हते म्हणून वायू आणि नौदलांच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. जंगलातील अनेक ठिकाणी वनमजूर , कर्मचारी अथवा सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी पहिल्यांदाच सीड बॉलचा उपयोग करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com