Panaji Election: बाबूश यांच्या पॅनेलमध्ये 7 नवे चेहरे, ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज सादर; पूर्ण यादी वाचा..
पणजी : ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सकाळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, पणजी भाजप मंडळ अध्यक्ष, तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत गाऱ्हाणे घातले.
महालक्ष्मी देवीसमोर नतमस्तक झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तत्पूर्वी माजी आमदार कुंकळ्येकर यांनी मंदिराबाहेर प्रसार माध्यमांपुढे भाजपपुरस्कृत बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलचे सर्व तीसही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. महापालिका क्षेत्रात झालेल्या विकासाच्या मुद्यावर पणजीतील नागरिक या उमेदवारांना निवडून देतील, असेही त्यांनी नमूद केले.
मडकईकरांवर प्रश्नांची सरबत्ती!
उमेदवारी अर्ज सादर करून आल्यावर माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. कारण महानगरपालिकेत मडकईकर यांनी काही महिन्यांपूर्वीच विरोधकांची भूमिका बजावली होती. स्मार्ट सिटीच्या कामावर त्यांनी जाहीरपणे टीका करताना महापालिकेच्या कामकाजावरही आसूड ओढले होते.
आता स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाल्यानंतर मडकईकर यांनी बाबूश यांचे कौतुक केल्याने पत्रकारांनी त्यांना घेरले. चोहोबाजूंनी प्रश्नांच्या फैरी येऊ लागल्यामुळे मडकईकर यांना बोलणे आवरते घ्यावे लागले. तत्पूर्वी शहरात केलेल्या विकासकामांच्या बळावर त्यांचे पॅनल पुढील पाच वर्षांसाठी मोठ्या फरकाने जिंकून येईल, असा विश्वास मडकईकर यांनी व्यक्त केला.
प्रभाग १९ चा उमेदवार बदलला
‘गोमन्तक’ने संभाव्य उमेदवारांची यादी १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत सात नवे चेहरे दिले होते, ते कायम आहेत. या यादीत बदल केला आहे, तो प्रभाग १९ मध्ये.
महिला राखीव असलेल्या या प्रभागात अगोदर नगरसेवक नीलेश मोरजकर यांच्या घरातील महिलेला उमेदवारी दिली होती. मात्र, आता त्यांच्या जागी निकिता नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग उमेदवारांचे नाव
१ - युतिका जांबावलीकर
२ - कॅरोलिना पो
३ - मार्गारिडा फर्नांडिस
४ - रोहित मोन्सेरात
५ - किशोर शास्त्री
६ - बेंटो लॉरेन
७ - संजीव देसाई
८ - करिना शिरोडकर
९ - कबीर पिंटो माखिजा
१० - प्रसाद आमोणकर
११ - तुकाराम चिन्नानवार
१२ - वर्षा शेट्ये
१३ - उदय मडकईकर
१४ - प्रज्योत वायंगणकर
१५ - शायनी चोपडेकर
१६ - अस्मिता केरकर
१७ - डेनिस एडवर्ड जॉर्ज
१८ - मिलिंद शिरोडकर
१९ - निकिता नाईक
२० - शुभम चोपडेकर
२१ - मनीषा मणेरकर
२२ - दीक्षा माईणकर
२३ - विद्या गडकर
२४ - करण पारेख
२५ - कीर्ती साखळकर
२६ - वसंत आगशीकर
२७ - विठ्ठल चोपडेकर
२८ - रूपेश हळर्णकर
२९ - सँड्रा दा कुन्हा
३० - सिल्वेस्टर फर्नांडिस
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

