लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी. दाबोळी विमानतळावर विमान उतरविल्याने गोंधळ झाल्याची माहिती.
कळंगुटच्या माझ्या लोकांनी परवानगी दिली तर पुढील विधानसभा निवडणूक मांद्रेतून लढणार. माझ्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार कोण असू शकतो याचीही चाचपणी सुरु. मांद्रेत सद्या भाजपचा आमदार नसल्याने तिथे वेगळ्या राजकारणाला वाव. साळगांव, शिवोली, कळंगुटलाच जोडून असलेल्या मांद्रे मतदारसंघावर माझा भर. मायकल लोबोंचे महत्वाचे विधान.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडू दीपराज गावकरची गोवा संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुयश प्रभुदेसाईकडे उपकर्णधार जबाबदारी सोपपण्यात आली आहे. 23 नोव्हेंबरपासून हैदराबादमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
'कॅश फॉर जॉब' प्रकरणात अटकेत असलेल्या मंत्री गोविंद गावडेंचा माजी स्टाफ मेम्बर अनिकेत कांदोळकर याला फोंडा न्यायालयाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पणजीमध्ये पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर, मिरवणूकीवर, लाऊडस्पीकरवर, घोषणाबाजी आणि फटाके उडवण्यास बंदी घातली आहे. BNSS च्या कलम 163 अंतर्गत हे निर्बंध 19-28 नोव्हेंबर दरम्यान लागू होणार आहेत.
धारगळ-पेडणे येथे होणाऱ्या सनबर्नविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यावर बुधवारी (20 नोव्हेंबर) रोजी सुनावणी होणार आहे
गोव्यात 21 नोव्हेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शव प्रदर्शन सोहळा आयोजित केले जाईल. शव प्रदर्शनासाठी ओल्ड गोवा येथे बस वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि 27 डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
राज्यात सध्या नोकरी घोटाळा, मानवी तस्करी, लूट सारख्या प्रकारांचा धुमाकूळ सुरु आहे म्हणूनच सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
"सरकारी नोकरी फसवणूक प्रकरणात कोणतरी गैरफायदा घेत आहे, मात्र राज्यातील युवा वर्गावर याचा परिणाम होत असून, लवकरच या प्रकरणांवर आळा घालणे गरजेचे आहे." सरकारने सखोल व कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले.
सरकारी नोकरी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दीपाश्री सावंत हीच साथीदार अनिकेत कांदोळकर (27, माशेल) याला सोमवारी (दि. 18 नोव्हेंबर) रोजी रात्री म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली.
सावर्डे सत्तरी येथे रेती उत्खनन करत असताना म्हादई नदी पात्रात बुडालेल्या सुवर्णा गावकर या महिलेचा मृतदेह अखेर सापडला. अग्निशामक दल व स्थानिकांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.