Goa Electricity: वीज क्षेत्रात राज्याला स्वयंपूर्ण बनवू

Goa Electricity: मुख्यमंत्री : कारापुरात भूमिगत वीजवाहिन्या कामाचा शुभारंभ
Goa Electricity Issue
Goa Electricity Issue Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Electricity: राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्कम सहकार्य मिळत आहे. त्यांच्याच सहकार्यामुळे वीज क्षेत्रात राज्याला स्वयंपूर्ण बनविणे हा सरकारचा संकल्प आहे. या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी गावागावांत सौरऊर्जा निर्मितीसारखे प्रकल्प उभे राहणे ही काळाची गरज आहे.

Goa Electricity Issue
Rice Price Increase: 25 किलो तांदूळ पोत्यामागे 200 रुपयांची वाढ

सौरऊर्जा प्रकल्प फायदेशीर ठरतानाच, त्यापासून रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडले.

मये मतदारसंघातील कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. कारापूर येथे रविवारी (ता.१५) पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.

Goa Electricity Issue
CCTV Camera: मुळगाव बगलमार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव : सरपंच तृप्ती गाड

अन्य मान्यवरांत वीज खात्याचे संचालक स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, शंकर चोडणकर, कारापूरचे सरपंच दत्तप्रसाद खारकाडे आणि तन्वी सावंत यांचा समावेश होता. कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात ११ केव्ही भूमिगत वीज केबल घालण्याच्या या प्रकल्पावर १९.५ कोटी खर्च येणार आहे. एकूण २४ किलोमीटर अंतर व्यापले जाणार आहे.

प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी सरकारच्या सहकार्यामुळे मये मतदारसंघातील वीज समस्या कायमची सुटणार, असा विश्वास व्यक्त करून विकासकामांसाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. स्टिफन फर्नांडिस यांनीही वीज खात्याच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला. वल्लभ सामंत यांनी स्वागत केले. विठ्ठल शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

केंद्र सरकारचे सहकार्य

वीज क्षेत्रात साधनसुविधा उभारण्यासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारकडून २८९ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करतो. यामुळे या निधीतून राज्यात ज्या भागात वीजसमस्या आहेत त्या भागाचा विकास केला जाईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.

वीज क्षेत्रात क्रांती घडविणे. हे राज्य सरकारचे ध्येय असून, त्यासाठी केंद्र सरकारकडूनही भरीव सहकार्य मिळत आहे. येत्या डिसेंबरपर्यंत १ हजार कोटी खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, या निधीतून वीस मतदारसंघांत भूमिगत वीज केबल घालण्यात येणार आहे.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

‘तामनार’ वीज प्रकल्पाला जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पंचायतींसह देवस्थान, कोमुनिदाद आदी संस्थांसह नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत पणजी शहराला ‘सोलार सिटी’ करण्यात येणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com